जिल्हा प्रतिनिधी / महेंद्र महाजन जैन -
वाशीम - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा वाशीमच्या वतीने विरांगणा 2017 अंतर्गत ‘सेल्फ डिफेन्स कॅम्प’ या महिला व मुलींसाठी आत्मसुरक्षितेसाठी आवश्यक असणार्या बाबींवर प्रशिक्षण मार्गदर्शन व प्रात्यक्षिक शिबीराचे आयोजन दि. 3, 4 व 5 मे या तीन दिवसात सायंकाळी 4.30 ते 6.30 दरम्यान स्थानिक राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेमध्ये करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये महिला व मुलींना संकटसमयी आपला बचाव करण्यासाठी आपले संरक्षण कसे करावे याचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण वाशीम जिल्हा कुडो असोसिएशनचे प्रशिक्षक रंजीत कथडे व सुजाता इंगळे हे देतील. शेवटच्या समारोपीय सत्राला पीएसआय नम्रता राठोड ह्या उपस्थित राहून महिला सुरक्षा या विषयावर महिलांना मार्गदर्शन करतील. तसेच या शिबीरामध्ये लाठीकाठी, तलवारबाजी, व मैदानी खेळाचे प्रात्यक्षिक अक्षय गिरी व विजय धोंगडे हे प्रशिक्षक करुन दाखवतील. तरी या तीन दिवसीय शिबीराचा लाभ महिला व मुलींनी घेेण्याचे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा वाशीमच्या वतीने करण्यात आले आहे. शिबीरात भाग घेण्यासाठी 2 व 3 मे रोजी राणी लक्ष्मीबाई शाळेत सकाळी 10 ते 3 वाजेपर्यत येवून आपले नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment