महेंद्र महाजन जैन/-
चिखली :
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चिखली अर्बन बँकेच्या वतीने बस स्थानकावरील जलकुंभासह परिसराची स्वच्छता रविवार, दि. ३० एप्रिल रोजी करण्यात आली.
बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या पुढाकारातून बँकेचे संचालक व कर्मचार्यांनी बँकेने बस स्थानक परिसरात बांधलेल्या जलकुंभाची स्वच्छता केली. जलकुंभावर लावलेली पत्रके काढून असपासची घाण व कचरा देखील साफ करण्यात आला. बँकेच्या संचालक व कर्मचार्यांनी श्रमदानाद्वारे या संपूर्ण परिसराची स्वच्छता केली. बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या सह संचालक शेषराव शेळके, पुरूषोत्तम दिवटे, राजेंद्र शेटे, भिष्म गुरूदासाणी, ,मनोहर खडके, जीवन सपकाळे, सुनीता भालेराव, सरला भवर, सरव्यवस्थापक संजय भंगिरे, कर्मचारी प्रतिनिधी भास्कर परिहार यांच्या सह बँकेचे कर्मचारी व प्रतिष्ठीत नागरीक या अभियानात सहभागी झाले होते.
Post a Comment