कोंढवा : कोंढवा कमेला बुद्धविहार येथील झोपडपट्टीवर एसआरए ने मोठी अतिक्रमण कारवाई करून २७२ झोपडी पाडून जागा मोकळी करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सन २०१५ मध्ये इथे झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए )योजना मजूर करण्यात आली . त्यानंतर याचे काम नोंदणीकृत ऑक्सपर्द प्रोपर्टीज या विकासकला देण्यात आले. १५००० स्वे.फुटाच्या जागेवर एसआरए योजना राबवायची आहे. त्यामुळे विकासकाला हि जागा विकसन करण्यासाठी मोकळी करुण पाहिजे होती. याठिकाणी २७२ झोपड्या होत्या. त्यांना २३ मार्च २०१७ रोजी झोपड्या रिकाम्या करण्याबाबत कायदेशीर नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. या नोटीशीनंतर येथील १२२ झोपडीधारकांनी विकासकाने केलेल्या कोंढव्यातील शिवनेरीनगर निवासस्थानात स्थलांतर केले होते. परंतु काही झोपडीधारक तेथेच स्थळ ठोकून होते.
आज अशा ६० ते ६५ झोपडीधारकांवर जेसीबी साह्याने कारवाई करण्यात आली. यामुळे येथील जागा मोकळी झाली आहे. विकासकाने लगेच पत्र्याचे शेड मारून जागा ताब्यात घेतली आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून मोठ्या पोलीस बंदोबस्तात हि कारवाई करण्यात आली . 5 जेसीबी , एक एसीपी , १४ पोलीस निरीक्षक , १५०पोलीस कर्मचारी यांच्या बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.
यावेळी झो.पु.प्रकल्पाच्या तहसीलदार गीता गायकवाड म्हणाल्या , यापुढेही एसआरए प्रकल्प राबविताना अशीच मोठी कारवाई झोपडीधारकांवर राबविण्यात येईल, तेंव्हा झोपडी धारकांनी सहकार्य करावे असेही त्या म्हणाल्या. आजची कारवाई एसआरएचे मुख्य अधिकारी महेश झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार गीता गायकवाड , झो.पु.प्र.च्या तहसीलदार राधिका हावळ , इंजिनियर अर्जुन जाधव यांनी केली.
याप्रंगी कोंढवा वाहतूक पोलिसांनी खबरदारी म्हणून सकाळी 7 पासून दुपारी ३ पर्यंत कमेला ते साळुंखेविहार हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. कोंढवा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी एसीपी रवींद्र रसाळ, कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर , वर्षाराणी पाटील, अंजुमन बागवान, एपीआय कुलाल तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार यावेळी घडला नाही.
Post a Comment