BREAKING NEWS

Sunday, April 30, 2017

शेतकऱ्यांच्या उपोषणाला आ.डॉ.अनिल बोंडे यांची भेट - पिडीत शेतकऱ्यांची समस्या निकाली काढा, अधिकाऱ्यांना दिले निर्देश.


मोर्शी (अमरावती)




तालुक्यातील अप्पर वर्धा कैनलच्या चुकीच्या बांधलेल्या पुलामुळे पार्डी नाल्याचे पाणी अडून शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान करते. शासनाकडून या नुकसानीची भरपाई मिळावी याकरिता पार्डी येथील प्रदीप सोलव, नंदकुमार भामकर, गंगाधर सोलव, प्रशांत सोलव, जीवन सोलव हे ५ शेतकरी मोर्शी तहसील कार्यलयासमोर गेल्या ४ दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीररीत्या असल्याचे लक्षात येताच मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी आमरण उपोषण मंडपाला भेट दिली. शेतकऱ्यांची समस्या समजावून घेतली. व कृषी खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी तरीत्व संपर्क साधून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून द्यावी व असलेली समस्या ताबडतोब निकाली काढावी असे निर्देश हि यावेळी अधिकाऱ्यांना दिले.*
  *यावेळी मातोश्री त्रिवेणी बोंडे महिला सूतगिरणीच्या अध्यक्षा डॉ.वसुधाताई बोंडे, जिल्हा परिषद सदस्य प्रा. संजय घुलझे, अनिल डबरासे, सारंग खोडस्कर, शरद मोहाड, मोर्शी पंचायत समितीचे उपसभापती सुनील कडू, नगर परिषद मोर्शीचे सभापती मनोहर शेंडे, नगरसेवक आप्पासाहेब गेडाम, नितीन राऊत, हर्षल चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष अजय आगरकर, शहराध्यक्ष दीपक नेवारे, भाजपाचे रवी मेटकर, अनिकेत राऊत, आदित्य बिजवे, भूषण काळमेघ, राहुल चौधरी यांच्यासह इत्यादी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.