Monday, May 1, 2017
कारंजा नगर परिषदेमध्ये जाहिरात रोस्टरच्या नियमाचे उल्लंघन जिल्हा रोस्टर डावलून जिल्हयाबाहेरील वृत्तपत्रांना जाहिराती
Posted by vidarbha on 8:23:00 AM in | Comments : 0
महेंद्र महाजन जैन / रिसोड
मंगरुळपीर-
यादीवर नसलेल्या व रजिस्ट्रेशन नसलेल्या जवळच्या स्थानिक वृत्तपत्रांना टेंडरच्या जाहिराती
मुख्याधिक़ारी व रोस्टर अधिकार्यावर कारवाईची स्मॉल ऍन्ड मिडीयम न्युजपेपर असोसिएशन जिल्हा शाखेची मागणी
जिल्हाधिकार्यांसह माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्र्यांना पुराव्यासहित तक्रार करणार
जिल्हाध्यक्ष संदीप पिंपळकर यांची माहिती- जिल्हयातील कारंजा नगर परिषदेमध्ये गेल्या सहा महिन्यापासून शासन निर्णयानुसार ठरवून दिलेल्या जाहिरात रोस्टरच्या नियमाचे सर्रास उल्लंघन केल्या जात असून आपल्या मर्जीतील जवळच्या वृत्तपत्रांना आर्थिक व्यवहार करुन कारंजा नगर परिषदेतील संबंधीत रोस्टर अधिकार्यांकडून सर्रास टेंडरच्या जाहिराती वितरीत केल्या जात आहेत. यातही जी वृत्तपत्रे शासनमान्य जाहिरात यादीवर नाहीत किंवा ज्या वृत्तपत्रांना आर.एन.आय. दिल्लीचा रजिस्ट्रेशन क्रमांक नाही वा जी वृत्तपत्रे शासनाच्या लेखी बंद आहेत अशा जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील अनेक वृत्तपत्रांना मोठमोठ्या लाखो रुपये कामाच्या जाहिराती मनमानीपणे व रोस्टर डावलून दिल्या जात आहेत. या प्रकाराची जबाबदारी संबंधीत रोस्टर अधिकारी व मुख्याधिकारी यांच्याकडे असून त्यांना ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतरही मुख्याधिकारी हे नियमाला डावलून जाहिरात वितरण करणार्या संबंधीत अधिकार्यांवर कोणतीच कारवाई करायला तयार नाहीत. त्यामुळे या सर्व प्रकारात मुख्याधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या सखोल चौकशी व संबंधीतांवर कारवाईसाठी स्मॉल ऍन्ड मिडीयम न्युजपेपर असोसिएशन जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यासह महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय आणि मुख्यमंत्र्यांना पुराव्यानिशी तक्रार देणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पिंपळकर यांनी दिली. तसेच या प्रकरणी कारवाई न झाल्यास शासनमान्य यादीवर असलेल्या व नेकी आणि निष्ठेने जिल्हा, तालुका, शहर व ग्रामीण भागात स्वखर्चाने वृत्तपत्रे प्रकाशित करुन शासकीय योजना जनसामान्यांपर्यत पोहचविणार्या वृत्तपत्रांना न्याय देण्यासाठी वेळ पडल्यास न्यायपालिकेत याचिका दाखल करण्याचा निर्णयही पिंपळकर यांनी जाहीर केला.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment