चांदुर रेल्वे - (शहेजाद खान ).-
शहरात रविवारी नाट्यकलावंतांनी सादर केलेल्या ‘शांतेच कार्ट चालु आहे’ नाटकाने उपस्थित अनेक प्रेक्षकांची मने जिंकली. या नाटकात कलावंतांनी सादर केलेली वेगवेगळी भूमिका रसिकांच्या मनात वेगळा ठसा उमटवून गेली.
शहरातील महारूद्र बहुउद्देशीय शिक्षण संस्था व साहस जनहितकारी बहुउद्देशीय संस्थेतर्फे 'शांतेच कार्ट चालु आहे' या तुफान भन्नाट विनोदी नाटकाचे आयोजन रविवारी सायंकाळी स्थानिक जिल्हा परीषद हायस्कुलमध्ये करण्यात आले होते.
या नाटकाचे उद्घाटन मुख्याध्यापक इंगळे यांनी केले. तसेच यावेळी अध्यक्ष म्हणुन जेष्ठ पत्रकार युसुफ खान होते. तर प्रमुख अतिथी म्हणुन नगराध्यक्ष शिट्टु उर्फ निलेश सुर्यवंशी, ठाणेदार शेळके, पत्रकार गुड्डु शर्मा यांची उपस्थिती होती. यानंतर झालेल्या नाट्यातुन नाट्यरसिकांची तुफानी विनोदी मेजवानी झाली. नाटकाचे लेखक श्रीनिवास भणगे असुन दिग्दर्शक दिपक बनसोड होते. संपुर्ण नाटकाची निर्मीती चेतन भोले या युवकाने केली. या नाटकामध्ये शामच्या भुमिकेत बिपीन लांडगे, शामच्या वडीलांच्या भुमिकेत दिपक बनसोड,शामची आईच्या भुमिकेत ज्योती भद्रे, शामची बायको रोशनी वासनिक, आजोबाच्या भुमिकेत गजानन गिरी, पोस्टमनच्या भुमिकेत कुलदिप तायडे, प्रेयसीच्या भुमिकेत प्रतिक्षा पोकळे व पोलीसाच्या भुमिकेच एजाज हुसैन यांनी सुंदर अशी भुमिका पार पाडली. शहरातील युवक - युवतींनी प्रथमच एवढ्या मोठ्या मंचावर असे सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता अध्यक्ष चेतन भोले, उपाध्यक्ष सचिन उईके, सचिव अमोल ठाकरेसह महारूद्र बहुउद्देशीय शिक्षण संस्था व साहस जनहितकारी बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्यांनी अथक परीश्रम घेतले. नाटकाच्या सुरूवातीला सुत्रबध्द संचलन कस्तुरी कनसे हीने केले.
Monday, April 10, 2017
'शांतेच कार्ट चालु आहे’ नाटकाने जिंकली प्रेक्षकांची मने शहरातील नाट्यकलाकारांचे सादरीकरण
Posted by vidarbha on 6:37:00 AM in चांदुर रेल्वे - (शहेजाद खान ).- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment