BREAKING NEWS

Monday, April 10, 2017

कल्याण येथे २ घंट्यांत हिंदूंचे मंदिर उद्ध्वस्त, तर दर्ग्यावरील कारवाईसाठी १० घंटे !

कल्याण – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत प्राथनास्थळांवर कारवाई करणे चालू केले आहे. या कारवाईचा एक भाग म्हणून कल्याण स्थानक परिसरातील कल्याणेश्‍वर मंदिर आणि सहजनांद चौकातील एक दर्गा तोडण्यास ८ एप्रिल या दिवशी सकाळी आरंभ करण्यात आला. महापालिकेचे क प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांनी सकाळी साधारण २ घंट्यांत मंदिर पाडण्याची कारवाई पूर्ण केली. ४५ वर्षे जुन्या असलेल्या मंदिराजवळ कागदपत्रे उपलब्ध नसल्याने हिंदूंनी मंदिर पाडण्यास कोणताही विरोध केला नाही.

१. सहजनांद चौकातील हजरत निगराणी शहाबाब दर्गा येथे शेकडो धर्मांध जमले आणि त्यांनी आमचा दर्गा तोडायच्या आधी सर्व मंदिरे तोडा, अशी ओरड करत कारवाईस विरोध करण्यास आरंभ केला. (मंदिरांवरील कारवाईच्या विरोधात हिंदू कधी संघटित होतात का ? – संपादक)
२. दर्ग्या पाडण्याआधी आम्ही धार्मिकविधी पूर्ण करू, मगच तुम्ही कारवाई करा, असे धर्मांधांनी सांगितले. उपस्थित अधिकार्‍यांनी त्यास मान्यता दिली. चार घंटे हा विधी चालू होता.
३. या कारवाईच्या वेळी एका धर्मांधाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सूर्यवंशी यांची गळपट्टी (कॉलर) पकडून त्यांच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्याला कह्यात घेण्यात आले आणि रात्री सोडून देण्यात आले. (असेच उद्दाम धर्मांध हे पोलिसांवर प्राणघातक आक्रमणे करू धजावत आहेत आहेत. असे असूनही पोलीस त्यांना अशा घटनांत गुन्हाही प्रविष्ट न करता सोडून देत आहेत, हे आश्‍चर्यच आहे. कायदा हातात घेण्याचे धर्मांधांचे धैर्य दिवसेंदिवस वाढत चालले असतांना पोलीस त्याविषयी काही कृती का करत नाहीत ? धर्मांधांची अशी आक्रमणे खपवून घेतल्यानेच ते पुढील आक्रमणासाठी सिद्ध होतात, हे पोलीस लक्षात का घेत नाहीत ? – संपादक)  याविषयी एका पोलिसाने सांगितले, आमचे मुख्य काम दर्गा हटवणे होते. त्याच्यावर गुन्हा नोंदवला, तर पुन्हा जमाव एकत्र येणार आणि पोलीस यंत्रणेवर दबाव येणार.

दर्गा आणि मंदिर यांच्यावरील कारवाईच्या वेळी लक्षात आलेला भेद

१. दर्ग्याच्या कारवाईच्या वेळी विविध पोलीस दले आणि पालिकेचे कर्मचारी मिळून २०० कर्मचारी उपस्थित होते, तर मंदिरावर कारवाई करतांना केवळ ४० कर्मचारी उपस्थित होते.
२. दर्ग्यावर कापड टाकून ही कारवाई करण्यात आली. मंदिरावर अशा प्रकारचे कोणतेच कापड टाकले नव्हते.
३. दर्ग्यावर कारवाई होतांना मुसलमानांनी दर्ग्याचे पत्रे उतरवणे, अन्य बांधकाम पाडणे आदी स्वतःच केले, अन्य कोणालाही तिथे हात लावू दिला नाही. सर्व मुसलमान हमारे बाबा है असे म्हणून स्वतःच सर्व काम करत होते. केवळ थडगे गॅस कटरने कापण्यास अनुमती दिली. मंदिर पाडण्याचे सर्व काम पालिका कर्मचार्‍यांनी केले.
४. दर्गा पाडल्यावर त्याची माती नेऊन मुसलमानांनी लगोलग त्यांच्या स्वतःच्या जागेत जाऊन हा दर्गा उभारला. मंदिरासाठी मात्र महापालिकेने अद्याप जागा दिलेली नाही.
क्षणचित्रे
१. दर्गा पाडतांना कर्मचारी पुष्कळ घंटे उन्हात जेवण आणि पाण्याविना काम करत होते.
२. या वेळी काही लोकप्रतिनिधींनी पोलिसांनाच दम भरल्याचे समजते.
३. सहजनांद चौक परिसरात काही दुकाने बंद ठेवण्यात आली होती. (यावरून दर्गा पाडतांना लोकांना दंगलीची भीती वाटते, हे लक्षात घ्या ! ही दहशत हिंदूंनी किती दिवस सहन करायची ?- संपादक)
४. या वेळी एका धर्मांधाने ये बहुत जागृत दर्गा है, आपको इसकी बददूवा मिलेगी अशी धमकी अधिकारीवर्गास दिली.


साभार - दैनिक सनातन प्रभात संकेतस्थळ 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.