जिल्हा प्रतिनिधि / महेन्द्र महाजन-
वाशीम - आजकालच्या धकाधकीच्या जीवनात माणूसकी हरवत चालल्याचे नेहमी बोलले जाते. मात्र माणूसकीचा झरा हा अविरत सुरु असल्याच्या घटनाही घडत असतात. अशीच एक घटना नुकतीच शहरात अनुभवावयास मिळाली. येथील रहिवासी तथा तालुक्यातील धानोरा मापारी येथे जि.प. शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत समाधान गिर्हे यांनी रस्त्यावर सापडलेले पाकीट संबंधीतांचा शोध घेवून परत केले.
गिर्हे हे वाशीमवरुन धानोरा मापारी येथे कर्तव्यावर जात असतांना पूसद रोडवरील रेल्वे गेटजवळ रस्त्यावर काळ्या रंगाचे पाकीट आढळले. ते त्यांनी पाहीले असता त्यात एटीएम कार्ड, पैसे व महत्वाची कागदपत्रे होती. संबंधीतांना संपर्क नसल्याने त्यांना ते पाकीट परत करण्यात अडचण निर्माण झाली. त्यानंतर त्यांना पाकीटमधील एका कागदपत्रावर गिर्डा असा उल्लेख दिसला. मग त्यांनी गिर्डा मिळाला सदर हकीकत सांगुन संंबंधीत बाळू बेलखेडे या व्यक्तीचा भ्रमणध्वनी घेवून त्याच्याशी संपर्क साधला. व त्यांना वाशीम येथे बोलावून त्यांना ते पाकीट परत केले. परत करण्याची इच्छा असेल तर मार्गही सापडतो याचा अनुभव गिर्हे यांना यावेळी आला. पाकीट सुपुर्द केल्यानंतर बेलखेडे यांच्या चेहर्यावरील आनंद पाहून गिर्हे यांना समाधान वाटले.
Post a Comment