जिल्हा प्रतिनिधि / महेन्द्र महाजन -
वाशीम - तालुक्यातील सुरकंडी येथील शंभूराजे सार्वजनिक वाचनालयात 14 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगन्नाथ भोयर हे होते. यावेळी प्रमूख मार्गदर्शक म्हणून वाचनालयाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष गजानन यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर व ग्रंथालय चळवळ’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. आंबेडकरांच्या ‘शिका व संघर्ष करा’ या घोषणेबाबत विस्तृत माहिती दिली. यावेळी बबनराव धामणे, स्वप्नील भोयर, दिनेश जाधव, अविनाश जाधव, सौ. मालती धामणे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत जगन्नाथ भोयर यांनी व्यक्त केले. यावेळी गणपत धामणे, सौ. पूजा धामणे, कु. यशोमती धामणे, भागवत भोयर, अनिल भोयर, सुखदेव भोयर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय भोयर तर आभार दत्ता धामणे यांनी मानले.
Post a Comment