जिल्हा प्रतिनिधि/ महेन्द्र महाजन-
वाशिम : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बालासाहेब बोराडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment