अनेक महिन्यांपासुन स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेड अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. पहिलेच उन्हाळा सुरू असतांना प्रचंड ऊन तपत असुन एवढ्या उन्हात शेतकरी आज आपली तुर मोजल्या जाईल या आशेने दररोज बाजार समितीत येत आहे. अनेक शेतकऱ्यांची दीड महिन्यांपासुन तुर मोजणी झाली नसुन ज्यांची तुर मोजणी होत आहे त्या शेतकऱ्यांना भर उन्हात चांगल्या तुरीवर चाळणी मारायला नाफेड अधिकारी लावत आहे. असा मनमानी कारभार सुरू असतांना मंगळवार १८ एप्रिल रोजी नाफेडच्या मुंबई येथील अधिकारी मीनाकुमारी यांनी एसी गाडीतुन येऊन स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भेट दिली असता शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घालुन समस्या सांगितल्या.
डिसेंबर २०१६ मध्ये स्थानिक बाजार समितीत नाफेडची तुर खरेदी सुरू झाली. तेव्हा शेतकऱ्यांची तुर शेतात उभी होती. तरीही यावेळी मोठ्या प्रमाणात तुर खरेदी नाफेडने केली. ही तुर केवळ व्यापाऱ्यांचीच असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. व जेव्हा शेतकऱ्यांची तुर बाजार समितीमध्ये आली तेव्हा जागा नसल्याचे कारण पुढे करून तुर खरेदी बंद केली होती. मधात पुन्हा तुर खरेदी असतांना शेतकऱ्यांची चांगली तुर नाफेडने नाकारली. बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांची हजारो क्विंटल तुर भर उन्हात दीड महिन्यांपासुन पडुन आहे. उन्हामुळे तुरीचे पोतेही फुटत असुन तुर मातीसोबत मिसळत आहे. तसेच काळीही पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असुन नाफेड अधिकारी शेतकऱ्यांशी अरेरावी करत आहे. अशातच नाफेडच्या मुंबई येथील अधिकारी मीनाकुमारी यांनी मंगळवारी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीला एसी गाडीत येऊन अचानक भेट दिली असता शेतकऱ्यांनी घेराव घातला व समस्यांचे कथन केले. तसेच यावेळी सभापती प्रभाकरराव वाघ यांनीही नाफेड कर्मचाऱ्यांची मीनाकुमारी यांच्यासमोर खरडपट्टी काढली. यानंतर शेतकऱ्यांची तुर मोजणी सुरू झाली होती. मात्र नाफेड अधिकारी एसी गाडीने फिरत असुन ह्या अधिकारी खरंच शेतकऱ्यांना न्याय देणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भर उन्हात महिला शेतकऱ्यांची तूर दोनदा चाळनी मारून रिजेक्ट करणाऱ्या स्थानिक नाफेड कर्मचाऱ्यांना खरतर नाफेड अधिकाऱ्यांनी समज द्यायला हवी होता. मात्र एवढेही सौजन्य या महिला अधिकाऱ्यांनी दाखविले नाही हे विशेष. व शेतकऱ्यांना गोडाऊनची पाहणी करते असे सांगुण निघुन गेल्या.
शेतकऱ्यांची चांगली तुर खरेदी करणार - मीनाकुमारी
स्थानिक बाजार समितीत १५ मिनीटांच्या भेटी दरम्यान शेतकऱ्यांच्या समस्या एैकुन घेतल्यानंतर मुंबईच्या नाफेड अधिकारी मीनाकुमारी यांनी ज्या शेतकऱ्यांची तुर नाफेडच्या पात्रतेनुसार राहील त्या सर्व शेतकऱ्यांची संपुर्ण तुर आता खरेदी करणार असल्याचे सांगितले. मात्र डिसेंबर महिन्यात हजारो क्विंटल तुर कोणतीही पात्रता न पाहता खरेदी केली यावर त्या काहीही बोलल्या नाही तसेच नाफेड अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारावर सुध्दा मौन बाळगले.
Post a Comment