BREAKING NEWS

Wednesday, April 19, 2017

विश्वरूपम च्या सम्पादिका रुपाली बुले यांना नवरत्न दर्पण पुरस्कार - जळगाव येथे ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहात ;नवरत्न दर्पण पुरस्काराने ६० पत्रकारांचा सत्कार*


अचलपूर / श्री प्रमोद नैकेले -




चांदूर रेल्वे येथील जेष्ठ पत्रकार युसुफ खान यांना जळगाव येथील खासदार ए.टी. नाना पाटील यांच्याहस्ते नवरत्न दर्पन पुरस्कार प्रदान

जळगाव  ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्यां ,घटना मांडताना जीवावर उदार होऊन वाड्या -तांड्यातील ग्रामीण पत्रकार समाजाचे प्रश्न मांडण्याचे मोठे काम करीत असतात . शहरी पत्रकारितेपेक्षा ग्रामीण पत्रकारिता कुठेही मागे नसून दुर्गम भागात काम करीत असलेल्या पत्रकारांवर हल्ले होतात मात्र अशा घटनांना वाचा फोडण्याचे काम ते करीत असतात . शासन ,समाजव्यवस्थेवर अंकुश ठेवण्याचे महत्वाचे काम ग्रामीण पत्रकारांकडून होत असते असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांनी आज जळगाव येथे आयोजित अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या एक दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनात केले .दरम्यान पत्रकारांसाठी राज्याच्या युती शासनाने कायदा संमत केल्याबद्दल मुख्यमंत्र्याचा शासनाचे प्रतिनिधी म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन व आ. राजूमामा भोळे यांचा २५ किलोच्या भव्य पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . याप्रसंगी जलसंपदामंत्री ना. महाजन यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांना मोफत एसटी सेवा व इतर लाभ मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले . 

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकारसंघाचे अधिवेशन जळगाव येथील कांताई सभागृहात करण्यात आले होते .  दुपारी  जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते दीप्रज्वलन व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर ,कवयत्री बहिणाबाई चौधरी ,सानेगुरुजी यांच्या प्रतिमेला पूजन करून उदघाटन करण्यात आले . यावेळी अध्यक्षस्थानी आ. राजूमामा भोळे ,प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वलाताई  पाटील ,पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर ,ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे ,ज्येष्ठ पत्रकार हेमंत अलोणे ,ज्येष्ठ पत्रकार विक्रांत पाटील , ज्येष्ठ पत्रकार मनोज बारी ,बाजीराव पाटील , हेमंत पाटील माजी जी.प. उपाध्यक्ष मछिंद्र पाटील , समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे , ग्रामीण पत्रकार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने ,केंद्रीय कार्याध्यक्ष मधुसूदन कुलथे ,प्रदेशाध्यक्ष कैलास देशमुख ,केंद्रीय महासचिव सुरेश सवळे,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नरेंद्र कदम ,जिल्हाध्यक्ष भगवान सोनार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते . 

*यावेळी बोलताना ना. महाजन म्हणाले कि ,पत्रकार हे समाजाला आरसा दाखविण्याचे काम करीत आहे . पत्रकारांवर हल्ले होतात व त्यांना संरक्षण मिळण्यासाठी कायदा व्हावा हि भूमिका पक्ष व मुख्यमंत्री यांची होती.* अधिवेशन काळात विरोधकांनी अनेकवेळा सभागृहाचे कामकाज बंद पाडले . मात्र मी शेवटच्या दिवशी शेवटच्या तासाला कायदा मंजूर करवून विधेयक मंजूर करून घेतला असे सांगताच सर्व पत्रकारांनी टाळ्या वाजवून शासनाचे अभिनंदन केले . ना. सभागृहात महाजन म्हणाले कि ,   पत्रकारांनी समाजाला आरसा दाखविण्याचे काम केले असून शासनावर अंकुश ठेवला आहे . सध्याची पत्रकारिता मायक्रो झाली असून यात महत्वाचा वाटा हा ग्रामीण पत्रकारांचा असल्याचे गौरवोद्गार काढले . पत्रकारांना आरोग्य कवच दिले आहे . तसेच आपण गेल्या पंचवीस वर्षांपासून राजकारणात असून जातीपातीच्या ,पैशांवरून राजकारणावर कुणीही निवडून येत नसतो हे माझे उदाहरण आहे . नंदुरबार येथील महा आरोग्य शिबिरात जवळपास तीन लाख लोक सहभागी होतील असे ना. महाजन यांनी यावेळी सांगितले . 

शासन पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे व त्यांना लवकरच एसटी बससेवा मोफत करण्याचे आश्वासन यावेळी दिले . यावेळी ज्येष्ठ पत्रकार हेमंत अलोणे ,आ. राजूमामा भोळे ,केंद्रीय कार्यअध्यक्ष मधुसूदन कुलथे ,रवींद्र पवार ,ज्येष्ठ पत्रकार मनोज बारी ,आदींनी मनोगत व्यक्त करून ग्रामीण पत्रकारांची भूमिका मांडून पत्रकारांनी कालानुरूप पत्रकारितेत बदल करावे असा सूर मान्यवरांनी व्यक्त केला . 

*विविध ठराव मंजूर*

*पत्रकार संरक्षण कायदा मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर अभिनंदनाचा ठराव*

*ग्रामीण भागातील पत्रकारांचा पत्रकार  संरक्षण कायद्यामध्ये सरसकट समावेश करण्यात यावा.*

*ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृती देता न आल्यास किमान एस. टी . प्रवास मोफत करावा*

*पत्रकारांवर दाखल खोट्या गुन्ह्याची शहानिशा केल्याशिवाय गुन्हा दाखल करू नये , तसेच याबाबत चौकशी करूनच गुन्हा दाखल करण्यात यावा*

*ग्रामीण पत्रकारांचा सामूहिक विमा काढण्यात यावा*

*शासनाच्या विविध समितीमध्ये ग्रामीण पत्रकारांचा समावेश करण्यात यावा*

*महिला पत्रकारांचा समावेश शासनाच्या विविध उपसमिती मध्ये करण्यात यावा . आदी ठराव या ठिकाणी संमत करण्यात आले.  

शाहीर शिवाजीराव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज ,बेटी वाचवा ,सामाजिक ,पत्रकारांचे प्रबोधन करणारा पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली . यावेळी राज्यभरातून आलेल्या पत्रकारांनी भरभरून दाद दिली . तसेच धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालयच्या विद्यार्थांनी महिलांच्या समस्यां या विषयावर पोवाडा सादर केला . 

*नवरत्न दर्पण पुरस्काराने ६० पत्रकारांचा गौरव* 

सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास खासदार ए. टी . पाटील यांच्याहस्ते नवरत्न दर्पण पुरस्काराने ६० पत्रकारांचा गौरव यावेळी स्मृती चिन्ह ,शाल श्रीफळ देऊन करण्यात आला . याप्रसंगी आ. स्मिताताई वाघ , ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे ,विक्रांत पाटील , मनोज बारी ,केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने ,केंद्रीय कार्याध्यक्ष मधुसूदन कुलथे ,प्रदेशाध्यक्ष कैलास देशमुख ,केंद्रीय महासचिव सुरेश सवळे,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नरेंद्र कदम ,जिल्हाध्यक्ष भगवान सोनार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते . 

*ग्रामीण पत्रकाररिता उद्याचे भविष्य -विक्रांत पाटील* 

ग्रामीण पत्रकारिता उद्याचे भविष्य असून अनेक महानगरांमध्ये ग्रामीण भागातून आलेले पत्रकार हे संपादक झाले आहे . वर्तमान पात्रांचे धोरण लक्षात ठेऊन पत्रकारिता करावी आपल्या मुख्य उत्पन्नाचे माध्यम म्हणून पत्रकारिता न करता आवड म्हणून करावी असे स्पष्ट  मत ज्येष्ठ पत्रकार विक्रांत पाटील यांनी द्वितीय सत्रात व्याख्यान देताना त्यांनी मांडले . ग्रामीण पत्रकारांनी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करावा , बातमी दर्जेदार असावी याकडे लक्ष द्यावे ग्रामीण भागातील पत्रकारांना भविष्यात अनेक संधी  असतील असेही विक्रांत पाटील यांनी सांगितले . तसेच सकारात्मक पत्रकारिता करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले . 

*प्रास्ताविक भगवान सोनार यांनी तर संघटनेची वाटचाल नरेंद्र कदम यांनी मांडली . आभार ललित खरे यांनी मानले . तसेच दिवसभर चालणाऱ्या कार्यक्रमांचे सुत्रसंचलन एजाजुद्दीन काबिरोद्दीन शेख व मोहिनी सोनार ,यांनी केले.*  

*अधिवेशन यशस्वीतेसाठी*  प्रसाद  जगताप ,ललित खरे,गणेश पाटील ,सैय्यद  शब्बीर अली नियाजली,योगेश विसपुते , नरेश बागडे , ललित बडगुजर, लक्ष्मण सूर्यवंशी ,पवन पाटील,,अयाज मोहसीन ,संभाजी देवरे ,गणेश पाटील , राजेश बोदडे , विलास जोशी , सूर्यकांत कदम ,मिलिंद लोखंडे ,योगेश विसपुते , सलीम पटेल,महेंद्र अग्रवाल , अनिल पालीवाल ,किरण सोनवणे ,शांताराम जाधव,प्रकाश चौधरी,विनायक दिवटे ,कुमार नरवाडे, वसंतराव पाटील,प्रा. हिरालाल पाटील , कमलाकर माळी ,प्रतीक खराळे ,नागराज पाटील,प्रमोद पाटील , विजय पाटील,सतीश ब्राह्मणे , , प्रशांत येवले , प्रह्लाद सोनवणे ,  योगेश चौधरी, ज्ञानेश्वर पाटील , रवींद्र ठाकूर , कैलास कोळी , राहुल इंगळे , सागर तायडे आदीनी प्रयत्न केले

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.