अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-
अचलपूर शहर तसेही समस्यांचे माहेरघर म्हणुन ख्यातिप्राप्त आहे.येथे एक नव्हे तर अनेक समस्या दरदिवशी निर्माण होत असतात शहरातील नागरिकांना जणू समस्यांचा आता सराव झाल्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे.
अचलपूर शहरात समस्या सोडवण्यासाठी अनेक संघटना सदैव प्रयत्नरत असतात मात्र समस्या सुटण्याचे नावच घेत नाहीत.समस्यांनी त्रस्त येथील नागरिकांनी नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणूकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची निवड करतांना सुध्दा पक्ष
,जात व धर्म यांना बाजुला ठेवून अचलपूरच्या विकासासाठी अचलपूरचा नगराध्यक्ष निवडून दिला.पण..
समस्या आहेत तश्याच आहेत ऊलट वाढलेल्या दिसत आहे.शहरात स्वच्छतेची एैसीतैशी झालेली आहे.घंटागाड्या जवळपास हद्पार झालेल्या आहेत.नाल्या सफाई होत असलेली क्वचीतच दिसते.सार्वजनिक ठिकाणी व बाजारपेठा मध्ये सकाळी झाडण्याची पध्दत बंद झाली आहे.सांडपणी रस्त्यावर उतरून वाहतांना दिसतेच ब-याच भागात पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन फुटून ते पाणी सुध्दा रस्त्यावर पाहायला मिळत आहे.गांधी पुल परिसरात तर समस्यांचा डोंगरच उभा झालेला आहे.येथे रस्त्यावर कच-याचे साम्राज्य पसरलेले आहे.येथे बुधवार व शुक्रवारी बाजार भरतो ज्यामध्ये मास,मच्छी,चिकन व भाजीपाला मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असते बाजार संपल्यावर या दुकानदारांचा मागे राहिलेला कचरा व मास, मच्छी व चिकनचे अवशेष रस्त्यावर व परिसरात अस्ताव्यस्त पसरलेले दिसतात.येथे पाणीपुरवठा विभागाची मुख्य पाईप लाईनमधून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे या बाबत तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देत नाही प्रशासनाचे हे अक्षम्य दुर्लक्ष मात्र जागृत नागरीकांच्या निराशेचे कारण बनत आहे.रस्त्यांची दुर्दशा ही तर डोकेदुखीच आहे.अरूंद रस्ते व वाढते अतिक्रमण यामुळे केंव्हा कोणता बीकट प्रश्न ऊदभवेल सांगता येत नाही यामुळे येथील नागरिकांचे जिवीतास सुध्दा मोठा धोका संभवतो तेंव्हा प्रशासनाने या सर्व समस्या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी जनतेची मागणी आहे.नगराध्यक्षांनी सुध्दा या बाबतीत लक्ष देऊन जनतेच्या अपेक्षा पुर्ण करण्याचा प्रयत्न करावा असे जागृत युवा नागरिक व संत गाडगे महाराज तक्रार निवारण समितीचे सदस्य परीमल हेडावू यांनी म्हटले आहे.
Post a Comment