बेंबळा प्रकल्पांतर्गत गेल्या ८ वषार्ंपासून स्थलांतरीत झालेल्या तालुक्यातील घुईखेड पुनर्वसित गावांत नागरिकांना पाणी टंचाईमुळे पाण्याला वनवन फिरावे लागत आहे तसेच आठ- दहा दिवसांनी टॅंकरने केला जात असलेल्या पाणी पुरवठ्य़ामुळे पुनर्वसित नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. मात्र याकडे संबंधीत विभागाने पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उन्हाचा पारा चांगलाच तपत असताना बेंबळा प्रकल्प, यवतमाळ अंतर्गत गेल्या ८ वर्षांपासून तालुक्यातील घुईखेड गावचे पुनर्वसन करण्यात आले. परंतु सुख सुविधाचा अभाव अजुनही जाणवत आहे. कारण गावामध्ये काही ठिकानी नळ कनेक्शन आणि विहीर, हॅन्डपंप करण्यात आले. पण त्याला पाणी नसल्याने गावकर्यांच्या पाण्याची चांगलीच फजिती होत आहे. तेव्हा गावकर्यांना पाणी व्यवस्था म्हणून गावात ३-४ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पण तेही सुरळीत मिळत नसल्याने गावात चांगलीच संतापाची लाट पसरली आहे. तेव्हा गावातील महत्त्वाची सुख सुविधा म्हणून पाणीपुरवठा केला जावा, अशी तरतुद असताना गावाचे स्थलांतर होऊन कित्येक वर्ष उलटूनही यावर संबंधीत अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. तेव्हा, गावकरी हे अधिकार्यांच्या विरोधात चांगलेच संतापले असून येत्या काही दिवसात पाणी व्यवस्था सुरळीत न झाल्यास आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची सध्या गावात चर्चा रंगू लागली आहे. कारण वरून चांगलीच उन तपत असताना घरोघरी पाण्याचा टॅंकर येतो व तेव्हाच पाणी भरावे लागते. त्यामुळे गावकर्यांना समस्येचा सामना करावा लागत आहे. अशातच
पालकमंत्री लक्ष देतील का?
Post a Comment