BREAKING NEWS

Thursday, April 20, 2017

*तालुक्याच्या श्रमदानात आ.डॉ. अनिल बोंडे यांचा सहभाग.* 

वरुड (अमरावती) : -



महाराष्ट्रातील ३० तालुक्यामध्ये ८ एप्रिल २०१७ पासून सत्यमेव जयते वाटर कॅप स्पर्धेची सुरवात झाली असून यामध्ये पुन्हा वरुड तालुका समाविष्ट करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरु झालेली शासनाची जलयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठी नक्कीच जीवनदायी ठरणार आहे. जलयुक्त योजनेच्या माध्यमातून वरुड - मोर्शी तालुक्यातील प्रत्येक गावात जलसंधारण व पाणलोट व्यवस्थापन कसे करता येईल यावर आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षी हि तालुक्यातील वेगवेगळ्या गावात होत असलेल्या श्रमदानामध्ये स्वत: आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी हजेरी लावून पुढाकार घेतला आहे. यामुळे गावकऱ्यांचा उत्साह दुगुनीत झाला असल्याचे बोलल्या जात आहे.*
    *तालुक्यातील बेनोडा या गावाचा वाटर कप स्पर्धेमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.  बेनोडा या गावी सरपंच महिलेसह श्रमदाते हे सकाळी तसेच सायंकाळी दोन्ही प्रहरी मोठ्या उत्साहाने श्रमदानाचे महान कार्यात हिरारीने सहभागी होत आहे. रविवार रोजी वरुड - मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी तालुक्यातील विविध गावासह बेनोडा या गावी श्रमदानासाठी हजेरी लावली असता त्यांना जवळपास शंभर पेक्षा अधिक श्रमदात्यांसोबत श्रमदान करतांना एक वेगळीच अनुभूती येत होती. या श्रमदानात बेनोड्याच्या सरपंचा सौ. विमलताई भलावी, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळूभाऊ मुरुमकर यांच्यासह आदी नागरिक प्रत्यक्ष सहभागी झाले होते. श्रमदानात गावातील लहान मुलांपासून ते वयोवृद्ध नागरीकांचा आपल्या स्वईच्छेने सहभाग दिसून आला.* 
   *सत्यमेव जयते वाटर कॅप म्हणजे स्पर्धेच्या काळात जलसंधारण आणी पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करण्यासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये निर्माण केलेली स्पर्धा होय. या स्पर्धेतून वरुड – मोर्शी तालुक्याला ड्रायझोन मुक्तीसाठी योग्य फायदा होणार आहे असे प्रतिपादन मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी गावातील नागरिकांसोबत बोलतांना व्यक्त केले.*
      *बेनोडा येथील श्रमदानामध्ये गावच्या सरपंचा सौ. विमलताई भलावी, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळूभाऊ उर्फ नीलकंठ मुरुमकर, तंटामुक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम पडोळे, सौ.विशाखाताई विजयराव दुपारे, सौ.निर्मलाताई राजूभाऊ आहाके, सौ.रत्नाताई प्रकाशराव बागडे, सौ.गीताबाई प्रकाशराव पाटील, सौ.लीलाताई पांडुरंगजी नेहारे सौ. जयाताई गोहाड, गोपाल नांदुरकर, जयप्रकाश राऊत, संजय दिघेकर, हरीश खासबागे, अरुणराव बांबल, सुनील बनाईत, गणेशराव भलावी, ज्ञानेश्वर गोहाड, मोरेश्वर दिघेकर, रामदास फरकाडे, मनोज ठाकरे, गोविंदराव ठाकरे, ओमप्रकाश राऊत, संजय दिघेकर, मनीष फरकाडे, दिलीपराव ढोंगे, अन्नासाहेब यावले, पंकज गोहाड, देवेंद्र धोटे, मुरलीधर भडके, मनोज गुर्जर, मुरलीधर चौधरी, योगेश फरकाडे, रामदास फरकाडे, संतोष इंगळे, सतीश कुंबडे, मनोहरराव बांबल यांच्यासह गावातील महिला – पुरुष याच्यासह बालगोपाल – वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.