जिल्हा प्रतिनिधीे / महेंद्र महाजन जैन -
संत तुकाराम महाराज विद्यालय
कंकरवाडी या विद्यालयाचा विद्यार्थी सुनील सोपान डाखोरे याने एन.एम.एम.एस या परीक्षेत पात्र होण्याचा बहुमान मिळविला.आर्थिक दृष्ट्या मागास परंतु गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध या परीक्षेद्वारे घेतला जातो व आठवी ते बारावी पर्यंत पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते सुनील पात्र झाल्यामुळे संत तुकाराम महाराज विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकृष्ण ढेकळे यांनी सुनील डाखोरे चा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केल्यामुळे विद्यार्थ्यांचे आत्मबल वाढीस लागते त्यामुळे शिक्षक सुद्द्धा सन्मानास पात्र आहेत असे गौरवोद्गार काढले. सुनील वर्ग आठवीत मामाच्या घरी राहून शिक्षण घेत आहे परंतु अभ्यासाची आवड आणि शैक्षणिक वातावरण यामुळे पात्र झाला.वर्गशिक्षिका रेखा चाटसे व सर्व शिक्षक स्पर्धात्मक परीक्षेचे सतत मार्गदर्शन करीत असतात व विद्यार्थ्यांना जबाबदारीची आठवण करून देतात.सत्कार प्रसंगी संस्था अध्यक्ष श्रीकृष्ण ढेकळे सह मुख्याध्यापक साहेबराव जाधव,शिक्षक गजानन सानप, मदन खानझोडे,बद्रीनाथ फड,शिक्षिका रेखा चाटसे सह सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment