रिसोड/महेन्द्र महाजन जैन
श्री.शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मोप येथे आज दि.१२/०४/२०१७ ला सहविचार सभा पार पडली.सहविचार सभेचे अध्यक्ष मा.डाँ.गोपीकिसन सिकची साहेब अध्यक्ष श्री.शिवाजी कनिष्ठ विद्यालय मोप होते.मा.प्राचार्य श्री.डि.एन.अघडते सर, पर्यवेक्षक श्री.एस.एस.नरवाडे सर,क.महा.पर्यवेक्षक प्रा.अ.मो.सोनुने सर,जेष्ठ शिक्षक आर.एच.तापडिया सर,शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.एन.डि.सिकवाल बाबुजी यांची प्रमुख उपस्थिती होती.सन २०१६/२०१७ मध्ये शालेय कामकाज व१० वी,व१२वी ची परिक्षा चांगल्या पध्दतीने पार पाडल्याबद्दल अध्यक्ष साहेबांनी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी सन २०१७/२०१८ मध्ये नियोजन बध्द पध्दतीने सर्व शालेय कामकाज पार पाडण्याचे अभिवचन अध्यक्ष व प्राचार्य यांना दिले.सह विचार सभेला अध्यक्ष डॉ. सिकची साहेब व प्राचार्य अघडते सर यांनी मार्गदर्शन केले.आभार श्री.निलेश पुंड सर यांनी केले.
Post a Comment