बंजरंगबली की जय च्या जयजयकारने दुमदुमली अचलपूर नगरी
Posted by
vidarbha
on
8:57:00 PM
in
अचलपुर / श्री प्रमोद नैकेले /-
|
अचलपूर /-
श्री प्रमोद नैकेले /
- पवनपुत्र ,अंजनी सुत,केसरी नंदन बजरंगबली हनुमान जयंती सर्वत्र मोठया उत्साहाने साजरी करण्यात आली.

या निमित्त अचलपूर शहरातील पुरातन काळापासून प्रसिध्द असलेल्या काळाहनुमान व असंख्य छोट्या मोठ्या मंदिरात काल संध्याकाळी पासून हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये भजन कीर्तन तसेच होमहवन तथा पुजापाठ करण्यात आले.आज दिनांक ११ एप्रिल रोजी पहाटे साडे पाच वाजता बालहनुमान जन्मोत्सवास सुरवात झाली.धार्मिक विधी नुसार बालहनुमानाचा जन्म प्रत्येक मंदिरात भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने करून अभिषेक व पुजापाठाने भगवंताचे दर्शन घेतले.प्रत्येक मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.संध्याकाळी दरवर्षी प्रमाणे हनुमान आखाडा अचलपूर यांचे अध्यक्ष मोहनजी गोखले यांचे नेतृत्वाखाली गौशाला हनुमान मंदिर देवळी येथून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले यामध्ये वाद्यवृंद,डी.जे.व पारंपारिक दिंड्याचे तालावर भक्तगण बजरंगबली कि जय चे नारे लावत भक्तीत दंग झाले.शोभायात्रा जुना सराफा,अकबरी चौक,टक्कर चौक येथे हनुमान चालीसा पठन करण्यात आले तसेच शोभायात्रा समिती तर्फे नगराध्यक्षा सुनिता फीसके,उपाध्यक्ष शशीकांत जयस्वाल,नगरसेवक बंटी ककराणीया,नरेंद्र फीसके,स्वाती खोलापूरे,गोपाल खोलापूरे व ठाणेदार नरेंद्र ठाकरे आदी मान्यवरांचे शालश्रीफळ देवून सन्मान करण्यात आला व चावलमंडी मार्गे पुन्हा हनुमान मंदिर देवळी येथे महाआरती व प्रसाद वाटप करून समारोप करण्यात आला.शोभायात्रेत सर्व पक्षीय व धर्मीय नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.सहभागी सर्व भक्तांचे समिती अध्यक्ष मोहन मुलचंदजी गोखले यांनी आभार व्यक्त केले.अचलपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी चोख बंदोबस्त ठेवून शांततेत मिरवणुक पार पाडली.
श्री प्रमोद नैकेले /-
Post a Comment