Wednesday, April 12, 2017
सौर उर्जा प्रकल्पाचा शेतक-यांनी फायदा घ्यावा -कार्यकारी अभियंता राजेंद्र गिरींचे आव्हान
Posted by vidarbha on 8:55:00 PM in अचलपूर (श्री प्रमोद नैकेले ) : | Comments : 0
अचलपूर (श्री प्रमोद नैकेले )
-दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकार द्वारा सौर उर्जा प्रकल्प चालू करण्यात आला आहे.ज्याचा फायदा शेतकरी बांधवांनी घ्यावा असे आवाहन महावितरण चे कार्यकारी अभियंता राजेंद्र गिरी ,उपकार्यकारी अभियंता जयंत घाटे यांनी केले आहे. सौर उर्जा प्रकल्प वाढोना येथे भेट देवून शेतक-यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले की सौर उर्जा हा विद्युत चा अपारंपरीक स्तोत्र आहे याकारणाने शेतक-यांना याचे अनेक फायदे होतात. जसे की 24 तास विज उपलब्ध राहील. शेतक-यांना लोडशेडींग चा त्रास होणार नाही.या प्रकल्पाचा लाभ घेणा-या शेतक-यांना 90 टक्के सुट दील्या जात आहे.
या योजनाने विद्युत बीलापासून सुटका होईल. प्रकल्प सुरू केल्यानंतर शेतक-यांचे उत्पन्नात वाढ होईल चांगली शेती पीकेल त्यामुळे कर्जबाजारी होवून आत्महत्या करण्याची वेळ शेतकरी बांधवांवर येणार नाही तसेच विद्युत बचत होऊन देशसेवा होवून इतर कामाकरीता विद्युत बचत करण्याचे पुण्य कर्म शेतक-यांचे हातून घडेल असे मार्गदर्शन करून सौर उर्जा प्रकल्पाचा फायदा घेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता राजेंद्र गिरी ,उपकार्यकारी अभियंता जयंत घाटे यांनी केले.याप्रसंगी परिसरातील असंख्य शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment