BREAKING NEWS

Wednesday, April 12, 2017

रुग्णांच्या सेवेत दोन रुग्णवाहीकेचे लोकार्पण



महेंद्र महाजन/रिसोड


वाशीम - माजी न.प. सदस्य राजुभाऊ वानखेडे यांनी जिल्हा कॉंग्रेस कमेटीच्या नावाने  दोन रुग्णवाहीका वाशीमकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करुन दिल्या. या रुग्णवाहीकांचा लोकार्पण सोहळा स्थानिक छत्रपती शिवाजी चौक येथे सोमवार, 10 एप्रिल रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
    कार्यक्रमाचे उद्घाटक विधान परिषदेचे उपसभापती ना. माणिकराव ठाकरे हे होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार अनंतराव देशमुख यांची उपस्थिती लाभली. मंचावर जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष ऍड. दिलीपराव सरनाईक, आमदार अमित झनक, माजी आमदार किसनराव गवळी, माजी जि.प. अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, माजी जि.प. अध्यक्षा सौ. ज्योतीताई गणेशपुरे, सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक पटेल, डीएचओ शेलोकार, डॉ. कावरखे, नामदेवराव मापारी, गजानन लाटे, न.प. रिसोडचे अध्यक्ष यशवंत देशमुख, रमेश शिंदे, वसंतराव इरतकर, डॉ. रोठे, दिलीप देशमुख, दिलीप भोजराज, ऍड. प्रकाश इंगोले, परशराम भोयर, इफ्तेखार पटेल, अबरार मिर्झा, ऍड. अंभोरे, डॉ. तसलीम शेख, प्रकाश राठोड व राजुभाऊ वानखेडे यांचे वडील नामदेवराव वानखेडे यांची उपस्थिती होती.


    राजुभाऊ वानखेडे हे न.प. सदस्य असतांना ते गेल्या दहा वर्षापासून टँकरव्दारे विनामुल्य पाणी वाटप करीत आहेत. त्याची सुरुवात सुध्दा माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली होती. नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक उभे असतांना जनतेला आश्‍वासन दिले होते की, निवडून आलो किंवा नाही आलो तरीही दोन रुग्णवाहीका ह्या तयार करुन वाशीमकरांच्या सेवेत देईल व त्याचे भाडे सुध्दा ना नफा ना तोटा या तत्वावर अशी अल्प दरामध्ये गोरगरीबांच्या रुग्णांची सेवा करण्यास उपलब्ध करुन दिल्या.
    मंचावर उपस्थित असलेले वयोवृध्द शेतकरी तथा राजुभाऊ वानखेडे यांचे वडील नामदेवराव वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला. नामदेवराव वानखेडे यांना सहा मुले असून एक देशसेवेकरीता सिमेवर सैन्यामध्ये, एक मुलगा महाराष्ट्र पोलीसमध्ये, एक मुलगा हरिभक्त परायण व राजुभाऊ वानखेडे हे जनसेवा करतात. व दोन भाऊ उत्कृष्ट शेतकरी आहेत.
    हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता हुकूम तुर्के, मनिष डांगे, गोपाल काठोळे, संजय इंगोले, कृष्णा काठोळे, संदीप चिखलकर, संतोष जावळे, शैलेश सारसकर, गुड्डु इढोळे, वाय.के. इंगोले, हरिष चौधरी, बंडु चौधरी, शाम उफाडे, ख्वाजाभाई सुराळा, अफसरभाई, आरीफभाई, अन्सार मिस्त्री, गणेश गायकवाड, दत्ता घाटोळ, उज्वल देशमुख, अनिल देशमुख, कैलास थोरात, सुभाषराव देशमुख आदींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजुभाऊ चौधरी व दादाराव देशमुख यांनी केले. तर प्रास्ताविक राजुभाऊ वानखेडे यांनी व आभार प्रदर्शन शंकर वानखेडे यांनी केले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.