महेंद्र महाजन / रिसोड-
वाशीम - तालुक्यातील ग्राम खरोळा येथे श्रीमद् भागवत सप्ताहाचा कार्यक्रम व हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. हनुमान मंदिरात रामनवमीला सुरु झालेल्या या भागवत सप्ताहाची समाप्ती 11 एप्रिल रोजी हभप सुभाष महाराज खरोळा यंाच्या काल्याच्या किर्तनाने करण्यात आली. या सप्ताहातच हनुमान जयंतीही उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये बाहेरगावावरुन आलेल्या सर्व भजनी मंडळींचा आयोजकांच्या वतीने शाल, श्रीङ्गळ देवून सत्कार करण्यात आला. भागवत सप्ताह समारोप प्रसंगी सुनिल महाराज खरोळा यांच्या नियोजनातुन गावातुन भजन व टाळ मृदंंगाच्या तालात प्रभातङ्गेरी काढण्यात आली. यावेळी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या भागवत सप्ताहासाठी गावातील शिवगणेश उत्सव मंडळ, जय बजरंग मंडळ व भजनी मंडळींनी सहभाग घेतला. भागवत सप्ताह व हनुमान जयंतीचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मंदिराचे कार्यकर्ते, उत्तम ठाकरे, माजी सरपंच माणिक ठाकरे, केशव ठाकरे, हरिभाऊ ठाकरे, निळकंठ ठाकरे, विठ्ठल ठाकरे ठेकेदार, पंढरी बुरे, देविदास ठाकरे, नवनाथ ठाकरे, मुरलीधर वारकड, सुभाष लाडके, जयराम ठाकरे, रामेश्वर ठाकरे, मुरलीधर ठाकरे, महादेव ठाकरे, नानाराव वारकड, राजु ठाकरे, गणेश ठाकरे, शुभम ठाकरे, किशोर ठाकरे, राजु ठाकरे, विशाल ठाकरे, संजय ठाकरे, सुनिल ठाकरे, महादेव बुरे, मदन ठाकरे, संतोष ठाकरे, मंगेश वारकड, संतोष गावंडे, रामहरी ठाकरे, अनिल गावंडे, अजय ठाकरे, अशोक बोरचाटे आदी युवकांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बबनराव ठाकरे यांनी करुन आपली सेवा दिली. अशी माहिती शिव गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते गोपाल महादेव ठाकरे यांनी दिली.
Post a Comment