BREAKING NEWS

Saturday, April 8, 2017

नालंदानगर येथे फुले-आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव

महेन्द्र महाजन / वाशीम - 


स्थानिक नालंदानगर येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त जयंती उत्सव समितीच्या वतीने 11 ते 14 एप्रिल पर्यत विविध सांस्कृतीक व प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.
    त्यानुसार, मंगळवार, 11 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता राष्ट्रपिता म. फुले जयंती निमित्त महापुरुषांच्या प्रतिमांना मानवंदना व पुज्य भन्ते प्रज्ञापालजी वाशीम यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण व धम्मवंदना होईल. सायंकाळी साडे सात वाजता रेडीओस्टार भिमशाहीर धम्मानंद इंगोले आणि संच यांच्या समाज प्रबोधनात्मक गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, 12 एप्रिल रोजी सायंकाळी साडे सात वाजता पिंप्री येथील कु. प्रतिज्ञा देवराव भगत यांचे व्याख्यान, रात्री साडे आठ वाजता ‘अनुसरा शिकवण बुध्दाची’ हे सामाजीक नाट्य सादर केले जाईल. प्रतिक वानखेडे व ग्रुप नालंदानगर हे या नाट्याचे सादरकर्ते आहेत. गुरुवार, 13 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता चालता बोलता हा फुले, शाहू, आंबेडकर, रमाई, सावित्री, जिजाऊ यांच्या कार्यावरील प्रश्‍नोत्तरांचा कार्यक्रम होईल. व त्यानंतर साडे सहा वाजता सादरकर्ते दिग्दर्शक भंते अश्‍वजीत आणि संच यांच्या ‘शिलांचे पालन’ ही नाटीका सादर होईल. तसेच रात्री आठ वाजता ‘भिमा तुझ्या जन्मामुळे...’  या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रा.डॉ. रामदास इंगळे, शेषराव धांडे, दीपक ढोले, अनिल कांबळे, डॉ. विजय काळे, मोहन सिरसाट, महेंद्र ताजणे, प्रा. सुनिता अवचार, उषाताई अढागळे, हंसिनी उचित, प्रज्ञानंद भगत, विलास भालेराव, मधुराणी बन्सोड, ग.ना. कांबळे, धम्मपाल पाईकराव, ऍड. नारायण पडघाण इत्यादी कवी सहभाग घेतील.
    शुक्रवार, 14 एप्रिलला सकाळी साडे सात वाजता पुज्य भन्ते प्रज्ञापालजी यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण व धम्मवंदनेचा कार्यक्रम होईल. त्यानंतर साडेआठ वाजता भव्य धम्मरॅलीचे धम्मरथ, झेंडे, बॅनर, बॅन्डपथकासह   त्रिरत्न बुध्द विहारापासून नालंदानगर कर्मचारी वसाहत, सिव्हील लाईन पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यत काढली जाईल. रॅलीचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सामुहिक बुध्दवंदनेनंतर होईल. सायंकाळी सात वाजता अंकुश आंबटपुरे प्रस्तुत ‘गाणे निळ्या पाखरांचे’ ह्या बहारदार स्वरमैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे समारोपीय आभार संयुक्त उत्सव समितीचे अध्यक्ष एकनाथ धवसे हे मानतील. तरी या संयुक्त जयंती उत्सवाला व त्यानिमित्त होणार्‍या सर्व कार्यक्रमांना समाजबांधव व नागरीक, महिला भगिनींनी बहूसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब अंाबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती, नालंदानगरच्या वतीने अध्यक्ष एकनाथ धवसे, सचिव धम्मानंद भगत, कोषाध्यक्ष आनंद रणबावळे, उपाध्यक्ष ऍड. नारायण पडघाण, सदस्य डॉ. सहदेव चंद्रशेखर, अनिल ताजणे, आनंद कांबळे, भारत पडघाण, संजय वानखेडे, ऍड. पी.पी. अंभोरे, डॉ. मुरलीधर ताजणे, जगदेव चवरे, पांडूरंग गवई, विलास भालेराव, प्रा. मुकुंद वानखेडे, नारायण इंगोले, दिलीप गवई, मदन दहीसमुद्र, गजानन आठवले, अशोक अवचार, चंद्रकुमार दंदे, गणेश हनुमंते व समस्त उपासक, उपासिकांनी केले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.