BREAKING NEWS

Saturday, April 8, 2017

महावीर जयंती निमित्त जिल्हयातील मांसविक्री व दारुविक्री बंद ठेवण्याची मागणी



जिल्हा प्रतिनिधि / महेन्द्र महाजन -


: जैन बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त 9 व 10 एप्रिल रोजी जिल्हयातील सर्व कत्तलखाने, मांसविक्री व देशीविदेशी दारु विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याची मागणी महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती व समस्त दिगंबर जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, दारु उत्पादन शुल्क अधिकारी व पोलीस स्टेशनला निवेदन देवून केली आहे.
  या निवेदनात म्हटले आहे की, अखिल विश्‍वाला सत्य, अहिंसा, अपरिग्रहाचा संदेश देणारे जैन धर्मियांचे 24 वे तीर्थकर वर्तमान युग प्रवर्तक भगवान महावीर जन्मकल्याणक उत्सव रविवार, 9 एप्रिल व सोमवार 10 एप्रिल रोजी साजरा होत आहे. भारत हा सर्व धर्मियांचा देश असून भगवान राम, श्रीकृष्ण, भगवान बुध्द, महावीर, पैगंगर, गुरुनानक व महात्मा गांधी आदी महान थोर महापुरुषांची जन्मभूमी व कर्मभूमी आहे. या सर्व महान थोर पुरुषांनी पशुदयेयाच उपदेश दिला आहे. भगवान महावीरांनी जिओ और जिने दो हा प्रचार प्रसार केला आहे. व ह्या क्रुर हिंसेच्या काळात मानवाला हिंसाचारापासून परावृत्त केले आहे. आजही त्यांच्या शिकवणूकीची अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे. तरी भगवान महावीर जयंती निमित्त जिल्हयातील, तालुक्यातील व शहरातील सर्व कत्तलखाने, मांसविक्री व दारुविक्रीची दुकाने वरील दोन दिवस बंद ठेवण्याची मागणी महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती व समस्त दिगंबर जैन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. जैन समाजाच्या भावना लक्षात घेता यासंदर्भातील कार्यवाहीचे ठोस आश्‍वासन अधिकार्‍यांनी यावेळी दिले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.