BREAKING NEWS

Saturday, April 8, 2017

मेडशी येथे माकडाचा धुमाकूळ



जिल्हा प्रतिनिधि / महेन्द्र महाजन -



वाशिम- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे एका माकडाने 8 दिवसापासून धुमाकुळ घातला  आहे  5 लोकांवर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडल्याने गावात दहशत पसरली आहे .आठ दिवसापासून वन कर्मचारी यांनी सर्पमित्र व युवकांच्या मदतीने माकडाला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र माकड पसार होण्यात यशस्वी होत आहे .


मेडशी येथे काही दिवसा आधी एक माकड आले लोकांनी त्याला शेंगदाणे, आईस्क्रीम ,ज्यूस,द्राक्षे,खाऊ पिऊ घातल्याने माकड गावातच राहू लागले .माकड खाण्या पिण्यासाठी   सोकल्याने  आता अन्न पदार्थ न मिळाल्याने लोकांवर हल्ला करणे सुरू केले आहे . आठ दिवसात 5  लोकांवर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे .वन विभागाने माकड पकडण्यासाठी अथक परिश्रम चालविले आहे .अकोला येथून सर्पमित्र मुन्नाभाई यांस बोलाविण्यात आले .राजू साठे व काही युवक माकडाला पकडण्यासाठी अनेक क्लुप्त्या शोधत आहेत. 4 दिवासा आधी माकडावर वाघोटे टाकून  पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने वाघाटे फाडून पळ काढला .मोठ्या थोरासह लहान मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने वन विभागाने माकडाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी जनतेनी मागणी केली आहे

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.