BREAKING NEWS

Saturday, April 8, 2017

आता हागणदारीमुक्त गावातच होणार विकास कामे - एमआरईजीएस च्या कामांना ब्रेक - गटविकास अधिकारी योगेश जवादे यांची भुमिका

 महेंद्र महाजन जैन  / वाशिम:


स्वच्छ भारत मिशन ग्रामिण अंतर्गत मंगरुळपीर तालुका हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्यानंतर वाशिम जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी योगेश जवादे यांनीही आपली भुमिका जाहिर केली आहे. मंगरुळपीर तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी आपण कटीबध्द असुन ग्राम पंचायत हागणदारीमुक्त झाल्याशिवाय गावातील ईतर सर्व विकास कामे तात्पुरती बंद ठेवण्यात येणार असल्याचे जवादे यांनी जाहिर केले आहे. पंचायत समितीमध्ये आयोजित ग्रामसेवकांच्या आढावा सभेत त्यांनी ही भुमिका मांडली. यावेळी स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य राजेश जाधव यांची उपस्थिती होती.

बौठकीच्या सुरुवातीला स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावनिहाय शौचालय बांधकामाचा आढावा घेतला. मंगरुळपीर तालुक्यात मागील आर्थिक वर्षाचे 6 हजार शौचालय बांधायचे टार्गेट (लक्ष्य) पुर्ण करण्यात आले आहे. आता उर्वरीत 10 हजार शौचालय बांधायचे उद्दिष्ट पुढील दोन महिन्यात पुर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास गटविकास अधिकारी जवादे यांनी बोलुन दाखविला. हा तालुका हागणदारीमुक्त होण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार असुन यासाठी ग्रामसेवकांनी तत्परता दाखविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. एमआरईजीएस अंतर्गत ईतर सर्व कामांना तात्पुरता ब्रेक लावणार असुन केवळ शौचालय बांधकामांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. मात्र हागणदारीमुक्त गावांमध्ये एमआरईजीएस सह सर्व विकास कामे प्राधान्याने करणार असल्याचे जवादे यांनी सांगितले.त्यामुळे आता ग्रामपंचायतींना विकास कामे करण्यासाठी त्यांनी आधी आपले गाव हागणदारीमुक्त करण्याशिवाय पर्याय नसल्याचे बोलल्या जात आहे.

गटविकास अधिकारी योगेश जवादे यांच्या या भुमिकेमुळे काम न करणाज्या ग्रामसेवकांचे चांगलेच धाबे दणानले आहे. स्वच्छ भारत मिशनच्या कामात हलगर्जीपणा करणाज्या व बौठकीला गैरहजर असणार्‍या ग्रामसेवकांविरुध्द त्यांनी सुरुवातीलाच तीव्र नाराजी व्यक्त केली.

बौठकीला विस्तार अधिकारी भिकाजी पद्मणे, आरोग्य विस्तार अधिकारी कल्पना सावळे, स्वच्छ भारत मिशनचे राम श्रृंगारे, प्रफुल्ल काळे, रविंद्र वाढणकर, देवा राठोड, तालुका समन्वयक अभय तायडे, अभियंता मुल्ला आदिंची उपस्थिती होती.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.