चांदुर रेल्वे - (शहेजाद खान ) -
चांदुर रेल्वे शहरात सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून सर्रासपणे दारूची विक्री सुरू असल्याचे समजते. राज्य उत्पादन शुल्क अधिकारी याबाबत झोपेचे सोंग घेत असल्याचे चित्र आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या ५०० मिटर अंतराच्या आतील दुकाने बंद करण्याच्या हालचाली मार्चच्या सुरूवातीपासून सुरू झाल्या होत्या. त्यामुळे १ एप्रिलपासून ही दारू दुकाने बंद होणार असे गृहित धरले जात होते. अशातच १ एप्रीलला चांदूर रेल्वे शहरातील ६ बियरबार, १ वाईन शाॅप, ४ देशी दारू दुकानाला कुलुप लागले होते. मात्र यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून सर्रासपणे दारूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे चांदुर रेल्वेचे राज्य उत्पादन शुल्क अधिकारी हलगर्जीपणा करीत असल्याचे समोर आले आहे. बंद करण्यात आलेल्या काही दारू दुकानातच दारूची विक्री राजरोजपणे सुरू असल्याचे समजते. शहरात अवैध, विना परवाना खुलेआम दारू विक्री होत आहे. अनेक भागात पानटपऱ्या, हॉटेलवर विना परवाना दारू विक्री होते हे काही येथील नागरिकांना नवीन नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही दारूबंदी विभागाच्या आशिर्वादाने शहरात दारूचा महापुर वाहत असल्याचा आरोप काही नागरीकांनी केला आहे. दारूबंदी विभागाने आता शुद्धीवर येऊन अवैध विक्री करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करणार का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Wednesday, April 19, 2017
दारूबंदीनंतरही चांदुर रेल्वे शहरात दारूचा महापुर ? सुकोच्या आदेशाला केराची टोपली राज्य उत्पादन शुल्क अधिकारी झोपेतच
Posted by vidarbha on 6:13:00 AM in चांदुर रेल्वे - (शहेजाद खान ) - | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment