अमरावती -
राजकमल चौक येथे ‘राष्ट्रीय हिन्दू आंदोलन’
कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली अयोध्यानगरी ही प्रभु श्रीरामाची जन्मभूमी आहे, यावर वर्ष २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानेच शिक्कामोर्तब केले आहे मात्र तरीही या पवित्र भूमीवर अद्याप हिंदूंना पूजा करण्यास अनुमती नाही. हिंदूबहुल भारतात श्रीरामजन्मभूमीवर हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार नाकारला जाणेे, हिंदूंसाठी याहून मोठे दुर्दैव ते काय ! गेल्या १५ वर्षांत उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या मुसलमानांच्या लांगूलचालनाच्या भूमिकेमुळे तेथे हिंदूंना पूजेचा अधिकार मिळू शकला नाही. आता केंद्रात आणि उत्तर प्रदेशात व महाराष्ट्रात देखील भाजपचेच पूर्ण बहुमतातील शासन आहे. त्यामुळे हिंदूंना श्रीरामजन्मभूमीवर पूजा करण्यास विशेष अनुमती देण्याचा निर्णय घ्यावा, तसेच या प्रकरणी संसदेत श्रीराम मंदिर उभारणी संदर्भातील कायदा बनवून त्याच्या आधारे अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर उभारण्यास प्रारंभ करावा अश्या मागणी संदर्भात अमरावती येथे सनातन संस्था , हिंदू जनजागरण समिती,हिंदू महासभा व हिंदुत्ववादी संघटनानकडून एक दिवसीय राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. भारताची राज्य घटना धर्मनिरपेक्ष आहे. या तत्त्वानुसार देशातील सर्वधर्मियांना समान वागणूक मिळणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात आपल्या राज्यात विपरित परिस्थिती दिसून येत आहे. वर्ष २०१७ च्या राज्याच्या अर्थसंकल्पात केवळ विशिष्ट धर्मियांच्या कल्याणासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली आहे.त्याचा विरोध करणे या तीन विषयांसाठी हे आंदोलन आयोजीत करण्यात आले. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री नीलेश टवलारे यांनी आंदोलनाचा उद्देश्य व विस्तृत विषय मांडला. त्यासोबतच, हिंदु महासभेचे श्री नितीन व्यास, श्री शीवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री अभिषेक दिक्षीत, इत्यादींनी आपले विषया संदर्भात मत व्यक्त केले.
यावेळी सनातन संस्थेच्या सौ.विभा चौधरी, सौ. बेला चव्हाण, सौ. रेखा उंबरकर, सौ. स्मिता ठाकरे, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अर्चना मावळे, सौ. अरूणा बिंड, श्री अमोल जगदाळे, श्री श्याम सांगुनवेढे, श्री सारीष शिंगणे, श्री सुरज देवहाते, श्री मनोज विश्वकर्मा यांसह विविध संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.या वेळी हिंदुत्ववाद्यांकडून करण्यात आलेल्या मागण्या
१. महाराष्ट्र शासनाने त्यांचा अर्थसंकल्पामध्ये केवळ अल्पसंख्यांकांच्या पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांची केलेली तरतूद रद्द करून अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण थांबवावे.
२. देशभरातील घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना देण्यात येणार्या सर्व सुविधा तात्काळ थांबवून त्यांना देशाबाहेर हाकलून लावावे.
३) हिंदूंना श्रीरामजन्मभूमीवर पूजा करण्यास विशेष अनुमती देण्याचा निर्णय घ्यावा
वैशिष्टयपूर्ण
१) आंदोलन स्थळी भगवान श्रीकृष्ण यांची सुंदर अशी प्रतिमा विराजमान करून आंदोलनाला सुरवात करण्यात आली होती.
Post a Comment