महेंद्र महाजन / वाशिम :
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज ११ व्या नागरी सेवा दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी अप फोम शिट व स्टिकर्स कोटेशन मंजूरी आदेश, दि. 03.2017 र जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, वाशिमच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सन २०१६-१७ मध्ये उत्कृष्ट कामगारीबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, वाशिमच्या उपविभागीय अधिकारी कु. क्रांती डोंबे, कारंजाचे तहसीलदार सचिन पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. विनय राठोड, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक मोरे, रिसोड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुधाकर पानझडे, मालेगावचे तालुका कृषी अधिकारी एस. के. वाळके यांच्यासह रिसोड तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी आर. पी. देशपांडे, अव्वल कारकून अनिल घोडे (महसूल), धनंजय कांबळे (गृह शाखा), लघु टंकलेखक वैभव कुलकर्णी, वाशिम तहसील कार्यालयाचे तलाठी अरुण कुकडकर, जिल्हा नियोजन कार्यालयाचे शिपाई सुनील धानोरकर यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसीलदार रमेश जसवंत यांनी केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे प्रसारण
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिल्ली येथे झालेल्या ११ व्या नागरी सेवा दिनाच्या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण करण्यात येत होते. या कार्यक्रमात प्रधानमंत्री यांनी नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केलेले भाषण जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांना स्क्रीनवर दाखविण्यात आले.
Post a Comment