BREAKING NEWS

Saturday, April 22, 2017

अॉनलाईन युगातही तांडा मात्र अॉफलाईनच..? तांड्याच्या पुनर्रुत्थानासाठी राबवील्या जाताय तांडेसामू चलो अभियान

विशेष प्रतिनिधी /---




आजच्या डिजीटलायझेशन मौसमी प्रवाही वाऱ्यातही   'तांडा' मात्र कोरडाच राहतो आहे.तांड्याला अजूनही पायाभूत सुविधेचे,त्याच्या मानवी हक्काचे समृद्ध जीवन लाभायचेच आहेत आज सर्वत्र डिजीटलायझेशन करुन देश महासत्ताकडे वाटचाल करण्यासठी जोरकस प्रयत्न आणि तरतुद केल्या जात आहे.परंतु आजच्या या अॉनलाईन युगातही न्यायवंचित बंजारा समाजाची लोकवस्ती तांडा मात्र अजूनही अॉफलाईनच आहे.हे भयावह चित्र आज राज्यापुढे येत आहे. महाराष्ट्रात हजारोच्या संख्येने सर्वच विभागात तांडे मोठ्या प्रमाणात सुविधेअभावी स्थिरावलेले आहेत. अशा या दुर्लक्षित दुर्गम भागात वसलेल्या न्यायवंचित तांड्याच्या समग्र पुनर्रुत्थानासाठी राज्यात पहिल्यांदाच अभिनव *तांडेसामू चलो* अर्थात "तांड्याकडे चला'' हा लोकोत्तर अभियान राबवील्या जात आहे.सामाजिक बांधिलकिचा संदेश देणार्या या लोकोत्तर अभियानाचा आज सर्वत्र प्रशंसा होत आहे.  या अभियानाने तांड्यात सकारात्मक बदलाचे चित्र निर्माण होणारे आहे.न्यायवंचित तांड्यात प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या पुनर्रुत्थानासाठी कृतीआराखडा मांडल्या जात आहे. नव्या पिढीला स्वावलंबनासाठी आणि तांडा सबलीकरणासाठी याद्वारे बहुमोल समुपदेशन लाभत आहे.शिवाय शासनाच्या विविध योजना देखिल या माध्यमातून प्रत्यक्ष तांड्यापर्यंत पोहचत आहे.




    न्यायवंचितासाठी सातत्याने झटणारे प्रसिद्ध साहित्यिक एकनाथ पवार नागपूर यांच्या अभिजात संकल्पनेतून हे अभियान राज्यभर राबवील्या जात असून अभियानाला लोकप्रिय वृत्तपत्र दैनिक सकालचे सहयोग लाभले आहे.सह संपादक प्रमोद कालबांडे 'अॉन दी स्पॉट' तांड्याची दखल घेत आहे.पत्रकारीतेमधिल ही पहिलीच बाब मानावी लागेल.   आजच्या डिजीटल युगात तांडा न्यायवंचित राहु नये,यासाठी उभी झालेली ही एक मुव्हमेंट आहे.यासाठी  सुशिक्षित,हितचिंतक,धनधांडगे,लोकप्रतिनिधी यासह शासनाने तांड्याची प्रत्यक्ष दखल घेणे.आणि Pay back to Society' वरील ही लोकोत्तर संकल्पना जनमाणसात रूजवण्याची नितांत गरज असल्याचे मत अभियानाचे प्रवर्तक एकनाथ पवार यांनी व्यक्त केले.           शासन आणि तांडा यामध्ये दूवा साधण्यासाठी  *तांडादूत* म्हणून निवड केल्या जात आहे.


                 
  १).प्रत्येक तांड्याला स्वतंत्र महसुलीचा दर्जा देण्यात यावे.   
  २).तांड्याच्या पायाभूत विकासासाठी विशेष कृतीकार्यक्रम आखणे.           
    ३).रमाई घरकुल योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र 'सामकी माता' घरकुल योजना राबवीणे.        
    ४).महिला व युवा सक्षमीकरण करीता स्वयंरोजगार लघुउद्योग उभारणीसाठी विशेष तरतुद करणे.             ५).गोरसंस्कृती व गोरमाटी भाषा संवर्धनासाठी नागपूर येथे स्वतंत्र केंद्र उभारण्यात यावे.



यासह तांडा सबलीकरणासाठी विविध महत्वपूर्ण मागण्याचा यात समावेश आहे. तांडेसामू चालो अभियान  न्यायवंचित तांड्याच्या पुनर्रुत्थानासाठी संजीवन ठरत आहे.अधिक माहितीसाठी ९८५०१३१३६८  या भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येईल.  

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.