अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-
राष्ट्रीय शिक्षा अभियानार्तंगत प्रत्येकाला मोफत व सक्तीचे शिक्षण संपूर्ण देशात द्यायचे सरकार धोरण निश्चित करण्यात आले आहे.त्याकरिता सर्वतोपरी उपाययोजना केल्या जातात लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्या जातो पण या निधीचा उपयोग प्रशासन कोठे व कसा करीत आहे हा एक यक्ष प्रश्न बनलेला आहे यापूर्वी असाच सर्व शिक्षा अभियानाचा बट्टयाबोळ करून निधीचा दुरूपयोग झाल्याचे शासनाचे लक्षात आले म्हणून त्याचे स्वरूप बदलून राष्ट्रीय शिक्षा अभियान सुरू करण्यात आले परंतू या अभियानात सुध्दा पाहिजे तशी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसत आहे.अशीच काहीशी परिस्थिती अचलपूर तालुक्यात अनुभवायला मिळते आहे म्हणून आपल्या परिसरात असा शिक्षणाचा बोजबारा वाजू नये व प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांना योग्य व निरंतर शिक्षण मिळावे अश्या हेतूने स्थानीक मनसे पदाधिकारी विवेक महल्ले यांच्या नेतृत्वाखाली अंकुश पाटील,निश्चल हांडे,दिनेश पवार,पंकज पर्वतकर आदी शेकडो कार्यकर्त्यासह गटशिक्षणाधिकारी अचलपूर यांना निवेदन देवून मागण्या मांडल्या निवेदनात म्हटले आहे की शहरापासून खेडेगावात कोणत्याही परवानगी शिवाय चालणारे काँन्व्हेंटला परवानगी देवू नये,खाजगी शाळेतील अमान डोनेशनवल बंदी घालण्यात यावी,सर्व शाळेत फलकावर एकुण विद्यार्थी व 25% आरक्षित विद्यार्थी संख्या स्पष्ट निर्देशीत करावी,शिक्षक व मुख्याध्यापक मुख्यालयी असावे ,जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवावी,सर्व शाळेवर केंद्रप्रमुख,विस्तार अधिकारी,गटशिक्षणाधीकारी नियमित दौरे व्हावे त्यांनी वस्तुस्थिती नुसार नोंदी घ्याव्या व त्यावर कार्यवाही करावी व शाळेच्या शिकस्त वर्गखोल्या दुरुस्त व्हाव्या विद्यार्थ्यांना सर्व सुविधा युक्त तणाव मुक्त शिक्षण प्राप्त करून द्यावे अशा व अनेक मागण्या येणा-या काळात पुर्ण करण्यात याव्यात अन्यथा जनहितार्थ तिव्र आंदोलन सुध्दा करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
Post a Comment