BREAKING NEWS

Sunday, April 23, 2017

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन आवश्यक ! – श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

इंदूर (मध्यप्रदेश) येथे ‘हिंदु राष्ट्र आणि अडचणी’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद

सनातनच्या अ‍ॅण्ड्रॉइड आणि आयओएस् (ios (iphone)) ‘अ‍ॅप’चे प्रकाशन


सनातन संस्थेच्या Sanatan.org या संकेतस्थळाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून संकेतस्थळाचे अ‍ॅण्ड्रॉइड आणि आयओएस् (ios (iphone)) अ‍ॅप यांचे येथे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. हे अ‍ॅप इंग्रजी, हिंदी आणि मराठी या ३ भाषांमध्ये आहे. वाचक हे अ‍ॅप विनामूल्य ‘डाऊनलोड’ करून सनातन संस्थेच्या संकेतस्थळावरील माहिती पाहू शकतात. यामध्ये, विविध सणांची माहिती, आचारधर्म आणि साधनेविषयक माहिती, तसेच नवीन लेख वाचता येऊ शकतात. या समवेतच आध्यात्मिक त्रासांवर विविध उपचार आणि आपत्काळासाठी उपायपद्धती हे प्रमुख सदरही पाहिले जाऊ शकते.
डाऊनलोड लिंक :
१. Android: goo.gl/CBBO१m
२. IOS : goo.gl/A०R६nV
(टीप : या ‘लिंक्स’मधील काही अक्षरे ‘कॅपिटल’ असल्याची वाचकांनी नोंद घ्यावी.)

डावीकडून श्री. राहुल कोठारी, श्री. रमेश शर्मा, सुश्री मालासिंह ठाकूर, श्री. अभय वर्तक आणि श्री. प्रवीणकुमार खरीवाल, संस्थापक अध्यक्ष, स्टेट प्रेस क्लब
इंदूर (मध्यप्रदेश) – जर एक संन्यासी राज्याचा मुख्यमंत्री बनू शकतो, तर देशाला हिंदु राष्ट्र करण्यात काय अडचण आहे ? आतापर्यंत केवळ जम्मू-काश्मीरमध्येच फुटीरतावादी चळवळी डोके वर काढत होत्या; परंतु आता देहली, ओडिशा, भाग्यनगर (हैद्राबाद), मुंबई, केरळ येथेही भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देण्यात येत आहेत. त्यामुळे भारत सरकारच्या संकेतस्थळावरही आता ‘द लॅण्ड ऑफ हिंदू’ असणे आवश्यक आहे. जगात १५७ देश ख्रिस्ती आणि ५२ देश मुस्लिम आहेत, तर १०० कोटी लोकसंख्या असणारा भारत हिंदु राष्ट्र का होऊ शकत नाही ? याकरता हिंदूंचे संघटन आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले.
स्टेट प्रेस क्लबच्या वतीने येथील दुआ सभागृहामध्ये ‘हिंदु राष्ट्र आणि अडचणी’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून श्री. वर्तक बोलत होते. या कार्यक्रमाला प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष कृष्णकुमार अष्ठाना उपस्थित होते.
श्री. वर्तक म्हणाले, ‘‘वर्ष २०२३ मध्ये भारत नक्कीच हिंदु राष्ट्र बनेल. त्यासाठी राज्यघटनेत सुधारणा करणे आवश्यक आहे. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात घटनेत ४२ वी सुधारणा करून भारताला ‘धर्मनिरपेक्ष’ राष्ट्र घोषित करण्यात आले. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ सर्वधर्म समभाव आहे; मात्र याचे पालन कुठेही होतांना दिसून येत नाही. येथे हिंदु-मुसलमान यांच्यात भेद करण्यात येतो. एकाच शाळेत शिकणार्‍या गरिब मुलांना शिष्यवृत्ती मिळते, मुसलमान मुलांना सच्चर समितीप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते. येथे धर्मनिरपेक्षता कुठे शिल्लक आहे ? कारण घटनेत धर्मनिरपेक्षतेची व्याख्याच देण्यात आलेली नाही. त्यामुळे भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी आपल्याला संघटित होऊन लढले पाहिजे. लोकमान्य टिळक काँग्रेसचे १२ वर्षे अध्यक्ष राहिले आहेत. ते म्हणाले होते की, भारताला प्रगती करायची असेल आणि मोठे राष्ट्र बनायचे असेल, तर याला प्रथम हिंदु राष्ट्र घोषित केले पाहिजे. मग हिंदु राष्ट्राविषयी चर्चा होते, तेव्हा काँग्रेस याचा विरोध का करते ?

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.