Monday, May 29, 2017
चांदूर रेल्वे तालुक्यात भाजपाची शिवार संवाद सभा सूरू - नगरसेवक मोटवानी व शर्मा संवाद प्रमूख
Posted by vidarbha on 7:04:00 PM in | Comments : 0
चांदूर रेल्वे:-(शहेजाद खान )
भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर गावा- गावत जाऊन शिवार संवाद सभाच्या माध्यमातून शासनाने शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजनांची माहीती देत आहे. याच अनुशंगाने चांदुर रेल्वे तालुका भाजपाच्या वतीने सुध्दा शिवार संवाद सभा सुरू करण्यात आली आहे. भाजपाचे नगरसेवक संजय मोटवानी व निलीमा शर्मा हे शिवार संवाद सभेचे प्रमूख आहे. ते कार्यकर्त्यांसोबत प्रत्येक गावा गावात जाऊन शेतकऱ्यासोबत चर्चा करून त्यांना शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहीती देत आहे. गावामध्ये होत असलेल्या या सभेमध्ये नगरसेवक व गटनेते संजय मोटवानी, नगरसेविका सौ निलीमा शर्मा, पं.स. सदस्या सौ. राठोड, सौ. होले यांच्या सोबत भाजपाचे तालुका अध्यक्ष रविंद्र ऊपाध्ये , अमोल अडसड, संदीप सोळंके, सचिन होले, पंजाबराव राऊत, गणेश फरकाडे, गूड्डू बजाज, केशव वंजारी, मून्ना शर्मा, समिर भेंडे, संजय फूनसे, विलास तांडेकर यांची उपस्थिती असुन त्यांनी घुईखेड, आमला, पळसखेड, सातेफळ आदी गावांमध्ये जाऊन सभा घेतली आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment