Saturday, May 27, 2017
आज गझलनवाज भीमराव पांचाळे यांची सुरेल गझल मैफिल' प्राणात चंद्र ठेवू ' चांदूर रेल्वे येथील जि.प.हायस्कूलच्या प्रांगणावर
Posted by vidarbha on 3:04:00 PM in चांदूर रेल्वे / शहेजाद खान - | Comments : 0
चांदूर रेल्वे / शहेजाद खान -
' आम्ही सारे फांऊडेशन ' चांदूर रेल्वे टिम यांच्या वतीने गझलनवाज भीमराव पांचाळे यांचे ' प्राणात
चंद्र ठेवू ' सुरेल गझल मैफिलचे आयोजन २७ मे शनिवार रोजी सायंकाळी ६ वाजता स्थानिक जिल्हा
परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणावर केले आहे. कडक उन्हाळ्यात शीतल सुरेल
गझलची मैफील रंगणार आहे.
गझल एक जीवनशैली असून एक आनंद पर्वनी आहे. भावनाची ही अभिव्यक्ती ही मानवी मनाची गरज
आहे.गझलाचे दोन ओळींचा शेर जीवनाची एक चव आहे. शब्दांच्या ओलाव्यातून दुःखावर हळूवार फुंकर
घालण्याचे काम गझल करते. गझलातून भावनेचे प्रगटन होते.जीवन जगण्याची नवी उर्मी मिळते.
भिमराव पांचाळे यांच्या गायनात भावनेचा ओलावा घेऊन स्वर शब्दांना भेटतात. शब्दातील आशय
बोलका होतो, रसिकांशी संवाद साधला जातो आणि गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या खास शैलीत
सुरेल गझल मैफिल साकारते.भीमराव पांचाळे यांचे ' प्राणात चंद्र ठेवू ' या गझल मैफिलीत रसिकांनी
मोठ्या संख्येने हजेरी लावून आस्वाद घ्यावा असे आवाहन ' आम्ही सारे फाऊंडेशन ' चांदूर रेल्वे टिमने
केले आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment