अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-
लग्न म्हटले की हर्षोल्हास व आनंदोत्सव साजरा करण्याचे ऐकमेव साधन पण लग्न जोडने म्हणजे मुलामुलींच्या मातापिताकरीता एका दिव्यातून
जाण्यासारखे असते परंतू आपण हेही एकले असेल की लग्नाच्या गाठी परमेश्वर बांधतो हेच पाहायला मिळेल अचलपूर येथे होत असलेल्या अनोख्या विवाहसोहळ्यात.
सविस्तर असे की लग्न गाठी बांधतांना वरवधु मातापिता यांना किती पापड लाटावे लागतात हे सर्वश्रृत आहे त्यात काही व्यंग मुलामुली मध्ये असले तर गेले देऊळ पाण्यात.आजकाल लग्न जोडतांना मुलामुलींच्या सौदर्य,शिक्षण,घरची परिस्थिती विशेष म्हणजे आर्थिक परिस्थिती,घरातील व्यक्ती विशेष व नातेगोते तसेच सरतेशेवटी जात अश्या अनेक समस्या मधून जाऊन शेवटी देवानघेवाण जमले की लग्न होते अशी संकल्पना आहे व ती ब-याच प्रमाणात सत्य आहे.पण जर मुलामुलीमध्ये काही व्यंग असले तर ही गोष्ट अशक्यप्राय त्यामुळे असंख्य मुलामुलींना व त्यांच्या मातापित्यांना समाजात अपमानास्पद जिवन जगावे लागते पण लग्नाच्या गाठी परमेश्वर बांधतो हे म्हणने तेवढेच सत्य आहे.याचा प्रत्यय अचलपूर येथे होत असलेल्या लक्ष्मण उर्फ मयुर व दिपाली यांच्या विवाहसोहळ्यातून येईल.लक्ष्मण हा अचलपूर महिराबपुरा येथील रमेश व पद्माताई नशिबकर यांचा सुपुत्र जन्मताच त्याची वाढ खुंटली त्याची उंची वाढली नाही पण वय वाढले वयात आल्यावर मुलाचा संसार थाटून देणे हे कर्तव्य पण बुटका असलेल्या मुलाला कोणती मुलगी पसंत करेल ह्या विचाराने चिंतीत असलेल्या नशिबकर दांपत्यास लक्ष्मणच्या उंची ला शोभणारी मुलगी व अश्याच धर्मसंकटात सापडलेली आई सापडली.अमरावती स्थित मायानगरात राहणा-या संध्याताई सांवत अगोदरच पती गजाननराव सांवत यांचे निधन झाल्याने एकट्या पडल्या त्यात वाढ खुंटलेली मुलगी व तिच्या विवाहाची चिंता असणारी माता, त्यांची मुलगी दिपाली हिचा विवाह ६ जून ला शनीमंदिर महिराबपुरा अचलपूर येथे मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे.विशेष म्हणजे लक्ष्मण गोंधळी समाजाचा व दिपाली मराठा असून हा आंतरजातीय विवाह आहे या अनोख्या व आर्दश विवाहाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Post a Comment