Monday, May 1, 2017
गुड माॅर्निंग पथकाने पकडले; एकाला सोडले, दुसर्याला डांबले!
Posted by vidarbha on 8:29:00 AM in महेंद्र महाजन जैन / रिसोड | Comments : 0
महेंद्र महाजन जैन / रिसोड
मंगरुळपीर-
स्वच्छ भारत मिशन ग्रामिण अंतर्गत आज (रविवार दि ३०) वाशिम जि. प. च्या गुड माॅर्निंग पथकाने मंगरुळपीर तालुक्यातील दस्तापुर, वरुड, चांदई, लावणा, कोठारी आणि चेहल यागावामध्ये धडकले. सकाळी साडे पाच सहाच्या दरम्यान दोन वाशिम जि. प. च्या दोन पथकाने विविध गावात जाऊन ऊघड्यावर शौचास जाणार्यांची धरपकड केली.
वरुड खु येथील राजु धोंडु भगत याला पथकाने पकडल्यावर त्याच्या कुटुंबाने आठ दिवसात शौचालय बांधुन वापरण्याचे कबुल केल्याने त्याला सोडुन दिले. मात्र याच गावातील खंडु शंकर गव्हाणे याने पथकासोबत हुज्जत घातल्याने त्याला मंगरुळपीर पोलीस स्टेशनला आणुन पोलीसांच्या हवाली केले.
दस्तापुर येथील तीन व्यक्तींना पथकाने पकडुन नंतर सोडुन दिले.
यामध्ये चंद्रभान गोपीचंद आटपाडकर, महादेव चंद्रकांत काळे आणि बजरंग गोपीचंद अाटपाडकर यांना ऊघड्यावर जातांना पकडले. पथकाने या तीघांना गाडीत टाकुन गोलवाडी फाट्यावर अाणले. त्यांनी शौचालय वापरण्याची शपथ घेऊन पथकासमोर दिलगिरी व्यक्त केल्याने त्यांना सोडुन दिले.
मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात आली. पथकात उप मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, लेखाधिकारी विनायक साने, माहिती व संवाद सल्लागार राम श्रृंगारे, तालुका समन्वयक अभिजित गावंडे, ज्ञानेश्वर महाले, ग्रामसेवक विश्वनाथ व्यवहारे, विष्णु सावके, एस. एम शिंदे यांचा समावेश होता.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment