Monday, May 1, 2017
पालकमंत्री यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
Posted by vidarbha on 8:28:00 AM in महेंद्र महाजन जैन / रिसोड - | Comments : 0
महेंद्र महाजन जैन / रिसोड -
वाशिम, : महाराष्ट्र दिनानिमित्त दि. १ मे २०१७ रोजी आज सकाळी ८ वाजता पोलीस कवायत मैदान येथे मुख्य शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
ध्वजारोहणाचा मुख्य प्रशासकीय कार्यक्रम सकाळी ८ वाजता होणार आहे. त्यामुळे सकाळी ७.१५ ते ९ वाजेपर्यंतच्या कालवधीत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजत करण्यात येऊ नये. एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला ध्वजारोहण समारंभ आयोजित करावयाच्या असल्यास तो सकाळी ७.१५ पूर्वी किंवा सकाळी ९ वा. नंतर आयोजित करता येणार आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment