Monday, May 1, 2017
इंग्रजी शाळा 25 टक्के मोफत प्रवेश फी परताव्यापासुन वंचित
Posted by vidarbha on 8:27:00 AM in महेंद्र महाजन जैन / रिसोड वाशीम - | Comments : 0
महेंद्र महाजन जैन / रिसोड
वाशीम -
वाशीम जिल्हयातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर सन 2014-15 मधील 25 टक्के मोफत प्रवेश फी परतावा अंदाजे रु. ऐंशी लाख रुपये, शैक्षणिक सत्र 2015-16 मधील अंदाजे रुपये एक कोटी, 2016-17 मधील अंदाजे रुपये एक कोटी पंचवीस लाख रुपये फी परतावा आजपर्यत जिल्हयातील एकाही शाळेला मिळाला नाही.फी परतावा ज्या वर्षी विद्यार्थ्यांना 25 टक्के कोट्याअंतर्गत मोफत प्रवेश देण्यात आला त्याच वर्षी मिळावयास पाहीजे होता. तरीही संस्थाचालक अजूनही 25 टक्के मोफत प्रवेशामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. वरील तीन वर्षाचा फी परतावा कोटी रुपये रक्कम शासनाकडून शिक्षणाधिकारी यांचे बँक खात्यात जमा आहे असे समजते. परंतु वर्षभरापासून एकाही शाळेला फी परतावा मिळाला नाही. शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या कार्यालयात विचारणा केली असता ते म्हणतात की, मुख्य कार्यपालन अधिकार्यांना भेटा. त्यांना भेटलो तर ते म्हणतात की, उपशिक्षणाधिकारी यांना भेटा. अशा प्रकारे तीनही अधिकारी फी परताव्याचे प्रकरण संगनमत करुन एकमेकांवर लोटतात. व शाळांना वेठीस धरतात. 25 टक्के फी परताव्याच्या कागदपत्रांची पुर्तता करुनही वारंवार कागदपत्राची मागणी करतात. गेल्या दोन महिन्यापासून संस्थाचालक फी परताव्याची सातत्याने मागणी करीत आहेत. यामुळे इंग्रजी शाळा चालविणे संस्थाचालकांना कठीण झाले आहे. येत्या दोन दिवसात फी परतावा न मिळाल्यास महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे कार्यालय व जिल्हा परिषदेवर लोकशाही पध्दतीने मोर्चा काढून आंदोलन करतील असा इशारा मेस्टा संघटनेचे विदर्भ उपाध्यक्ष अभिजित देशमुख, जिल्हा अध्यक्ष संतोष गडेकर व जिल्हा संघटक किरण चौधरी यांनी दिला आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment