चांदुर रेल्वे – (शहेजाद खान)-
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 31 मार्च 2017 रोजी राज्यातील राज्य मार्गाच्या व राष्ट्रीय महामार्गालगत 500 मीटर अंतराच्या आत असलेल्या दारू दुकानांवर बंदी घालण्यात आली. असे असले तरी शहरात अवैध रीत्या अनेक ठिकाणी दारू सर्रास उपलब्ध होत होती. मात्र याकडे राज्य उत्पादन शुल्क व पोलीस यंत्रनेचे दुर्लक्ष होत होते. अशातच नुकत्याच झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अमरावतीचे ग्रामिण पोलीस अधिक्षकांचा समावेश आहे. नवीन एसपी डैशिंग असल्यामुळे शहरातील दारू विक्रेत्यांचे आतापासुनच धाबे दणाणले असल्याचे समजते.
सगळीकडे गेली अनेक वर्षे दारूबंदी व्हावी या मागणीसाठी महिला संघटनांसह इतरही संघटना लढा देत होत्या. मात्र ती काही बंद होत नव्हती. बेकायदेशीर, परवानाधारक अशा पद्धतीने विक्री होत असलेली दारू अनेकांचा संसार बुडवती झाली. होलसेल, रिटेल दुकाने सकाळीच ग्राहकांनी फुल्ल दिसत होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या दारू दुकानांवर बंदी घातल्याने दारू पिणाऱ्यांची चांगलीच अडचण झाली. मात्र तरीही चांदुर रेल्वेत दारू विक्रेत्यांनी दाराच्या आडून अवैध दारू विक्री करण्याचा सपाटा सुरुच ठेवला होता. व दारूचा दरही वधारला आहे. दर वाढूनही तळीरामांना दारू मिळतच होती. असे असतांना सुध्दा स्थानिक राज्य उत्पादन शुल्क व पोलीस यंत्रणा यांनी अद्यापही कुठलीही कारवाई केली नव्हती. अशातच जिल्ह्यातील खराब झालेल्या कायदा व्यवस्थेला दुरूस्त करण्यासाठी नवीन पोलीस अधिक्षक अभिनाश कुमार यांची नागपुर येथुन अमरावतीला बदली करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अमरावतीचे ग्रामिण पोलीस अधिक्षक लखमी गौतम यांची बदली झाली असुन त्यांच्या जागी अभिनाश कुमार येणार असल्याची माहिती मिळाली आहे. अभिनाश कुमार हे अवैध दारू, सट्टा याच्या तीव्र विरोधात आहे. यापहिले ते नागपुर पोलीस आयुक्तालयात जोन क्र. ३ मध्ये पोलीस उपायुक्त बनुन गेले असता दारूमुळे त्यांनी त्यापरीसरातील जवळपास ४०० सावजी मटन दुकानांवर खळबळ माजवली असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता शहरातील दारू विक्रेत्यांचे सुध्दा धाबे दणाणले अाहे. त्यांनी पदभार स्विकारल्यानंतरच शहरात संपुर्ण दारूबंदी होणार अशी प्रतीक्रीया काहींनी दिली.
Monday, May 1, 2017
नवीन एसपींच्या होणाऱ्या ऐंट्रीमुळे चांदुर रेल्वेत दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले शहरात अनेक दिवसांपासुन सुरू होती दारू विक्री
Posted by vidarbha on 8:34:00 AM in चांदुर रेल्वे – (शहेजाद खान)- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment