सद्यस्थितीत संपुर्ण भारतात बँकेच्या सर्वोच्च स्थानावर स्टेट बँक ऑफ इंडीया आहे. या बँकेची शाखा संपुर्ण भारतातील प्रत्येक खेड्या- खेड्यापर्यंत पोहचलेली आहे. मात्र तालुक्यातील घुईखेड येथील स्टेट बँकेतील कर्मचाऱ्यांचे दिवसेंदिवस एक- एक नमुने समोर येत आहे. बँक व्यवस्थापकाच्या हलगर्जीपणामुळे घुईखेडवासी त्रस्त झाले असुन चांगल्या बँकेच्या नावावर एक वेगळाच धब्बा येते लागत असल्याचे दिसत आहे.
नोटबंदीनंतर संपुर्ण भारतात जवळपास ५० दिवसापर्यंत पैसे काढण्यावर मर्यादा लावण्यात आली होती. यानंतर ही मर्यादा काढण्यात आली असुन सगळीकडे पहिलेसारखेच व्यवहार सुरू झाले आहे. मात्र तालुक्यातील घुईखेड येथील स्टेट बँकेत कैशिअरच्या इच्छेप्रमाणे पैसे मिळत असल्याचा आरोप या बँकेतील सामान्य ग्राहकांनी केला आहे. सामान्य गावकऱ्यांना जास्तीत जास्त केवळ दोन हजार रूपये खात्यामधुन एका दिवसात काढता येत असुन जे कैशिअरला नियम सांगतात व भांडण करतात त्यांनाच हवी तेवढी रक्कम काढता येत असल्याचे समजते. पैसे काढतेवेढी रक्कम दोन हजारच्यावर असल्यास अनेकवेळा कैशिअर स्लीप सुध्दा फाडुन फेकुन देत असल्याचा आरोप एका शेतकऱ्याने केला आहे. यासोबच स्लीप घ्या साठी सुध्दा पहिले खुप वेळ लाईनमध्ये ग्राहकांना उभे राहावे लागत असुन त्यानंतर पैसे काढण्याच्या दुसऱ्या लाईनमध्ये तास न् तास उभे राहावे लागते. कैशिअरचे ग्राहकांसोबत बोलनेही चांगल़्या पध्दतीचे नसुन आपल्या मनमर्जीप्रमाने कामे करत असल्याचे समजते. असे संपुर्ण प्रकार बँक व्यवस्थापकासमोर होत असतांना त्यांनी याकडे मौन बाळगले आहे. तसेच अनेकवेळा कर्मचाऱ्यांचीच बाजु घेत असतात. एकीकडे बँकतुन मर्यादेत पैसे मिळत असुन दुसरीकडे एटीएमसुध्दा महिनोमहिने बंद अवस्थेत पडलेले असते. त्यामुळे ग्राहकांना स्वत:चेच पैसे स्वत:ला मिळत नसल्यामुळे ग्राहकांत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. यामध्ये महत्वाचे रीजर्व बँकेतर्फे कुठलेही नियम लागु नसतांना आता आमचेच पैसे काढण्यावर मर्यादा लावण्याचे नवीन नियम काढणारे हे कोण ? उलट आमचे पैसे या बँकेत जमा असुन हे कर्मचारी म्हणजे आमचे नौकर आहे. तरी वरीष्ठांनी तत्काळ याकडे लक्ष द्यावे असे मत एका ग्राहकाने व्यक्त केले.
२० हजार ऐवजी दिले तब्बल ५० हजार
या घुईखेड येथील स्टेट बँकेतील कैशिअर किती मन लावुन काम करताच याचे एक उदाहरण समोर आले आहे. काही दिवसांपुर्वी घुईखेड येथील रहिवासी नंदकिशोर काकडे यांनी कैशिअर बँकेचे व्यवस्थित नियम सांगत मला २० हजाराचा विड्रॉल पाहिजे असल्याचे सांगितले. यानंतर मोठ्या मुश्कीलने कैशिअरने त़्यांना २० हजाराचा विड्रॉल दिला. मात्र ते ही दोन हजारांच्या तब्बल २५ नोटा म्हणजेच ५० हजारांचा. यानंतर त्यांनी ३० हजार बँकेला परत केले आहे. त्यामुळे हे कैशिअर अनेकांना दोनच हजाराचा विड्रॉल देत असुन तर काहींनी असे विड्रॉलपेक्षाही जास्त पैसे देत असल्याचे प्रकार घडत आहे
Post a Comment