BREAKING NEWS

Sunday, June 18, 2017

अल्पवयीन युवतीची रेल्वेखाली आत्महत्या चांदुर रेल्वे स्टेशनवरील घटना आत्महत्येचे कारण संशयास्पद


चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )-



चांदुर रेल्वे स्टेशनवर एका १७ वर्षीय अल्पवयीन युवतीने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजता घडली.
    प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार,  तालुक्यातील मोगरा येथील ईश्वरी बबनराव थेटे (१७ वर्ष) ही एका मैत्रीनीसोबत शनिवारी दुपारी  १.३० वाजता चांदुर रेल्वे स्टेशनवरील प्लैटफॉर्म वर बसली होती. सदर युवती गोष्टी करीत होत्या. दुपारी ३ वाजताच्या दरम्यान नागपुरकडे मालगाडी जातांना प्लैटफॉर्मजवळ येताच ईश्वरी थेटे ने धावत जाऊन त्या मालगाडीखाली आत्महत्या केली. सदर युवती यावर्षी १२ व्या वर्गात जाणार होती व स्थानिक राम नगर परीसरात भाड्याने वास्तव्यास होती. ही युवती अभ्यासात अत्यंत हुशार होती व तिला दहावीत ८६ टक्के गुण मिळाले होते. आत्महत्येचे ठोस कारण कळु शकले नसले तरी आत्महत्या संशयास्पद असल्याचे समजते. युवतीच्या बैगमध्ये सुसाईड नोट मिळाल्याचीही माहिती आहे.
   घटनेची माहिती मिळताच बडनेरा येथील जीआरपीएफने स्थानिक रेल्वे स्टेशनवर येऊन घटनेचा पंचनामा केला. व त्यानंतर घटनेचा खोल तपास सुरू होता. घटनेचा तपास जीआरपीएफचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकजकुमार चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे..

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.