मुंबई:
राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कॅबिनेटची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपायांवर चर्चा करताना कॅबिनेट मंत्री दिवाकर रावते यांनी शेतकऱ्यांना १० हजार रूपयांची मदत करण्याची मागणी केली होती. या मागणीला कॅबिनेटच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे. शेतीची कामेही प्रगतीपथावर सुरु आहेत. मात्र, शेतकऱ्यांकडे पेरणी आणि अन्य साधनांच्या उपलब्धतेसाठी भांडवल नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या सर्वात महत्वाच्या समस्येवर उपाय म्हणून प्राथमिक स्वरुपात राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला प्राथमिक मदत म्हणून १० हजार रुपयांची मदत दिली जाईल, असे जाहीर करण्यात आलं आहे.

Post a Comment