धामणगांव रेल्वे / Mangesh Bhujbal/-
वादळ वाऱ्यासह येणाऱ्या पावसाने मागिल 4 दिवसापुर्वी वाघोली येथिल घरांचे पडझड झाल्याचे वास्तव समोर असतांना तालुक्यातील गुंजी या गावातही जुनाट चिंचेच्या झाडाचाही परीसरात असलेल्या रहिवाशांना धोका निर्माण झाल्याच्या तक्रारी झाल्यानंतरही त्या झाडाचा बंदोबस्त न केल्याने अखेर काल अचानक आलेल्या वाऱ्याने त्या झाडाच्या मोठमोठया फांदया घरांवर पडल्याने पडझळ झाली आहे.
गुंजी गावातील पुनसे यांच्या घराजवळ भले मोठे फार पुर्वीचे जुनाट चिंचेचे झाड होते. या झाडाला बरीच वर्षे झाल्याने उंच वाढलेल्या फांदया सोसाटयांच्या वाऱ्याने कधीही तुटुन खाली पडतील व परीसरातील लोकांचे जिवीतास धोका निर्माण होवुन आर्थिंक नुकसानही होणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. सदर झाडाचा धोका निर्माण झाला असल्याची तक्रार संबंधित विभागाला व महसुल प्रशासनाला देण्यात आली होती. या तक्रारीवर लक्ष न दिल्याने अखेर काल रात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने सदर झाडाच्या मोठमोठया फांदया घरावर कोसळल्या यामध्ये घरांची टिनपत्रे वाकली व भिंती सुध्दा पडल्या आहेत.यामध्ये सुभाषराव पुनसे, निलेश पुनसे, बालु पुनसे व इतर एकाचे घराचे नुकसान झाले आहे. या झाडाच्या केव्हाही कोसळण्यासंदर्भात तहसिलदार यांनी तलाठी व्हि. व्हि. वानखडे यांनी अहवाल सादर केला असताना तहसिल प्रशासनाने सुध्दा या विषयाला महत्व दिले नसल्याचे मात्र या ठिकाणी स्पष्ट होत आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने सुध्दा वेळीच दखल घेवुन या जुनाट झाडाची कायदेशिर रित्या वाट लावली असती तर कदाचित आज पुनसे कुटुंबीयांचे आर्थिक नुकसान झाले नसते व तलाठयांनी दिलेल्या अहवालात झाडाचा हर्रास व तोडण्याची कारवाई केल्यास संभव्य धोका टळु शकतो व दुसरा प्रतिबंधात्मक उपाय नाही असे स्पष्टपणे नमुद केले असतांना तहसिलदार यांनी त्या विषयाचे गांर्भिय न ठेवल्याने गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
Post a Comment