BREAKING NEWS
Showing posts with label अमरावती न्यूज. Show all posts
Showing posts with label अमरावती न्यूज. Show all posts

Monday, December 26, 2016

आमदार श्री रवी राणा यांचा बडनेरा येथील कार्यालयात तोडफोड

अमरावती /- 


   अमरावती चे खासदार आनंदराव अडसूळ यांना अपशब्द बोल्याबद्ल युवासेना जिलाध्यक्ष पराग गुडधे यांच्या नेतृवात सर्व युवासैनिक व पदाधिकाऱ्यांनी आमदार श्री रवी राणा  यांचा कार्यलयाची  तोडफोड केली 

आज दुपारी १ वाजता  बडनेरा स्थित युवा स्वाभिमान पार्टी च्या  कार्यालय मध्ये जबर्दस्त तोडफोड केली . एवढ्यावर न थांबता रवी राणा यांचा कार्यकर्त्यांची धुलाई सुद्धा करण्यात आली . या सदर घटनेचा परिणाम अमरावती मधील राजापेठ स्थित स्वाभिमान च्या ऑफिस वर देखील पाहायला मिळाला परंतु पोलिसांनी वेळीच दाखल देत तिथे तगडा बंदोबस्त लावला 

Thursday, November 3, 2016

वेगळ्या विदर्भाचा मागणीसाठी विधानभवनावर ५ डिसेंबरला मोर्चा

अमरावती :-   VRAS विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे, या मागणीला घेऊन येत्या ५ डिसेंबरला विदर्भातील नागपूर येथील विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार असून, विदर्भ सर्मथक ठिय्या आंदोलन देखील करणार असल्याची माहिती स्थानिक श्रमिक भवन येथे आयोजित पत्रपरिषदेत समितेचे अध्यक्ष वामनराव चटप यांनी दिली. आंदोलनासंदर्भात केलेल्या पूर्वतयारीबाबत त्यांनी विस्तृत माहिती दिली.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गेल्या ४ वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी अनेक आंदोलने केली गेली. मात्र केंद्र सरकारने त्याची अद्यापर्यंत दखल घेतली नसल्याचे वामनराव चटप यांनी सांगत प्रधानमंत्री आणि गृहमंत्री यांना या संदर्भात भेटण्यासाठी वेळ मागीतल्यावर तो देखील देण्यात आला नाही. एवढेच काय तर लेखी निवेदने आणि पत्रांना साधे उत्तर देण्याचे कष्टही सरकारला घेता आले नसल्याचे चटप म्हणाले. यावेळी श्री वामनराव चटप , रंजनाताई मामर्डे ,  आणि इतरही सदस्य यावेळी उपस्थित होते 

Tuesday, October 25, 2016

"शिवसेना पक्षाचा सद्स्य नोंदणीचा शुभारंभ" -अमरावती महानगर पालिका (२०१७) निवडणूकीला सामोरे जाणे करीता मोर्चेबांधनी सुरू

अमरावती/---

नजीकच्या काळात होऊ घातलेल्या अमरावती महानगर पालिका(२०१७) निवडणूकीला सामोरे जाणे करीता मोर्चेबांधनी सुरू झाली असून हिंदूहृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार सोबत घेऊन मा.शिवसेना पक्षप्रमुख श्री ऊद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पक्ष बळकटीकरण व संघटना मजबूत करणे करीता मा.खा.तथा संपर्क प्रमुख श्री अरवींदजी सावंत तथा अमरावती जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष खासदार श्री आनंदरावजी अडसूळ साहेब यांचा  आदेशावरुन व श्री राजेशजी वानखडे शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनात भव्य शिवसेना सदस्य नोंदणीला स्थानिक प्रभाग क्रमांक ५ (महेंन्द्र काँलनी)  प्रभागातील संतोषीमाता नगर येथून मोठ्या धूमधडाक्यात सुरूवात करण्यात आली.परिसराचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख  श्री आशिष ठाकरे, विभाग प्रमुख श्री अविनाश देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला महेंन्द्र काँलनी हा प्रभाग मागिल निवडणूकीत पक्षाची पिछेहाट पाहता आता शिवसेनेने कंबर कसून कामाला लागली आहे नगर तेथे शाखा...शाखा तेथे सदस्य असे अभियान राबवत सदस्य नोंदणीत आगेकूच करत आतापासूनच पदाधिकारी,शिवसैनिक कामाला लागले असून परिसरातील नागरिकांच्या गाठीभेटीला सूरुवात करून प्रचारात आघाडीवर होत आगेकूच करत आहेत, स्थानिक नागरिकांचे समर्थन व चांगला प्रतीसाद पण या माध्यमातून लाभत आहे.परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणुन घेत त्या समस्यांचे निराकरण करणे करीता शिवसैनीकांनी व पदाधीकार्यानी स्वतंत्र कक्ष स्थापन करून त्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन करण्याचे अभियानच सुरू केले आहे.या प्रसंगी सर्व  श्री आशिष ठाकरे (शिवसेना उपशहर प्रमुख),अविनाश देशमुख (विभाग प्रमुख),बंडू देशमुख (युवा सेना जिल्हा समन्वयक) संजय वानरे, अजय नागापुरे,नंदू काळे,बंडू कथिलकर,जयंत ईंगोले,दिपक गडवाले,प्रफूल्ल गोबरे, चिंतामणी गहूकार,विवेक वासनकर,महेश लोखंडे,राजेश पाचघरे, श्याम खंडारे, देविदास खंडारे ईत्यादी मोठ्या संख्येने पदाधीकारी शिवसैनिक व परिसरातील नागरिक उपस्थीत होते.

Sunday, October 23, 2016

पू. आसारामबापूंची निर्दोष सुटका होईल ! - पू. संभाजीराव भिडे गुरुजी

पू. गुरूजींकडून सनातनच्या कार्याचे कौतुक


बैठकीला उपस्थित पू. बापूजींचे साधक आणि अन्य कार्यकर्ते 

     अमरावती - ढग सूर्याला खाऊ शकत नाही, केवळ काही काळापुरते झाकाळु शकतात आणि तेही दुरूनच. सूर्याच्या जवळ ते जाऊ शकत नाहीत; कारण सूर्य शेवटीसूर्यच आहे. पू. आसारामबापूंवर लावलेले आरोप खोटे असून लवकरच बापूंची निर्दोष सुटका होईल, असे मत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांनी संत पू. आसारामजी बापू यांच्या अमरावती येथील आश्रमात बोलतांना व्यक्त केले. 
     श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या स्थानिक शाखेद्वारे बापूंच्या अमरावती आश्रमात पू. भिडे गुरूजींच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत श्री योग वेदांत सेवा समितीचे सचिव श्री. मानव बुद्धदेव, श्री. दयाराम राठोड, श्री. नंदलाल तरडेजा आणि श्री. रामेश्‍वर इंगोले यांनी गुरूजींचा श्रीफळ अन् पू. बापूजींची पुस्तके भेट देऊन सन्मान केला. पू. बापूजींच्या साधकांशी चर्चा करतांना त्यांनी वरील विधान केले. 
सनातनच्या कार्याला जोड नाही, तोड नाही, उपमा नाही, बरोबरी नाही !
     सनातन संस्थेविषयी बोलतांना गुरुजी म्हणाले, सनातनच्या कार्याला जोड नाही, तोड नाही, उपमा नाही, बरोबरी नाही. तसेच दैनिक सनातन प्रभात हे सत्यनिष्ठ असून ते भारतातील सर्वच भाषांमध्ये निघाले पाहिजे. सभेला मार्गदर्शन करतांना गुरूजींनी येत्या डिसेंबर महिन्यात आयोजित गडकोट मोहिमेत सहभागी होण्याचे उपस्थितांना आवाहन केले. या प्रसंगी गुरूजींनी क्षात्रतेज जागवणारी गीते सर्वांना सामूहिक म्हणायला लावली. सभेला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अभिषेक दीक्षित, श्री. महेश लढके, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे, युवा सेवा संघाचे श्री. राहुल नेरकर तसेच अमरावती, बडनेरा, नागपूर, कारंजा, नेर, मोर्शी आदी अनेक शहरांतील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आणि विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, युवा सेवा संघ आदी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Thursday, October 20, 2016

भारतीय जनता पार्टीची पश्चिम विदर्भ विभागाची प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक- मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस यांचा उपस्थितीत सुरु

अमरावती /- आज स्थानिक अमरावती येथील हॉटेल ग्रँड महफिल येथे भारतीय जनता पार्टीची पश्चिम विदर्भ विभागाची प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा.खा. रावसाहेब दानवे पाटील यांच्या उपस्थितीत सुरु झाली आहे 
सदर बैठकीस जेष्ठ भाजपा नेते मा. अरुणभाऊ अडसड, मा.ना. भाऊसाहेब फुंडकर, प्रदेश संघटन महामंत्री मा. रवीजी भुसारी, प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदासजी आंबटकर, प.विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर तसेच सर्व मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकारी हजर आहे त येणाऱ्या निवडणुका पाहता  त्या विजयी कशा करता येतील याही संदर्भात आजचा बैठकीत चर्चा होणार आहे 

छत्रपती शिवरायांचा वारसा असलेले गडकोट सुरक्षित ठेवू न शकणार्‍या पुरातत्व खात्यालाच बंद करण्याची वेळ आली आहे ! - श्री. नितीन व्यास, हिंदु महासभा, अमरावती

हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी 
हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन 

आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ
      अमरावती - सध्या आपण नवीन किल्ले बांधू शकत नाही; परंतु असलेल्या किल्ल्यांचे तरी जतन करायला हवे. किल्ल्यांवरील शिवरायांच्या आठवणी पुसल्या जात आहेत. असे असतांनाही पुरातत्व खाते स्वतः लक्ष घालून त्यांचे संरक्षण करत नाही. त्यामुळे आम्हाला आंदोलन करावे लागते, मग त्या पुरातत्व खात्याचे कामच काय ? ते खातेच बंद करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन येथील हिंदु महासभेचे श्री. नितीन व्यास यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे २३ गडकोट अजूनही खाजगी मालमत्तेचा भाग आहेत. त्यांना पुरातत्व खात्याने स्वतःच्या कह्यात घेऊन संरक्षण द्यावे, तसेच चिनी बनावटीचे फटाके वापरू नयेत, या मागण्यांसाठी १८ ऑक्टोबरला दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत राजकमल चौकात राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री योग वेदांत सेवा समिती, भगवे वादळ या संघटनांसह एकूण ४२ कार्यकर्ते उपस्थित होते.
मान्यवरांचे मार्गदर्शन 
राष्ट्र्रहित म्हणजेच सर्वांचे हित ! - श्री. मानव बुद्धदेव, श्री योग वेदांत सेवा समिती 
     पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांनीही फटाक्यांना विरोध केला आहे. ती आपली संस्कृतीच नाही. त्यामुळे राष्ट्रहिताचा विचार करता फटाके फोडू नका. 
किल्ले नष्ट होण्याच्या मार्गावर ! - श्री. अभिषेक दीक्षित, श्री शिवप्रतिष्ठान
       शिवरायांच्या किल्ल्यांचे योग्य संरक्षण न केल्याने आज ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. शासनाने वेळीच त्यावर योग्य ती उपाययोजना करावी. शत्रूराष्ट्र चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालून त्याला धडा शिकवावा. 

Tuesday, October 18, 2016

नागरिक सुविधा व भूखंड वाटपाचे काम त्वरित करा : आ.डॉ.अनिल बोंडे

 निम्न चारगड –पंढरी मध्यम प्रकल्पाच्या आढावा बैठकीत मागणी.
        *खोपडा – बोडणा गावाच्या ७५० कुटुंबाना मिळणार लाभ.
         निम्न चारगड –पंढरी मध्यम प्रकल्प होणार विकसीत.
         २४ ऑक्टोंबर पर्यंत सर्वे करण्याचा अधिकाऱ्यांचा निश्चय. 

अमरावती :--


   मोर्शी विधानसभा मतदार संघातील पुनवर्सन कुटुंबांना शासनाची मदत म्हणून भूखंड प्राप्त व्हावे व नागरिक सुविधा मिळाव्या याकरिता आमदार डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात मोर्शी तालुक्यातील निम्न चारगड प्रकल्प तसेच वरुड तालुक्यातील पंढरी मध्यम प्रकल्प या प्रकल्पाबाबत असलेल्या पुनवर्सन विषयक समस्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आढावा बैठक पार पडली.  खोपडा – बोडणा गावातील ७५० कुटुंबांना लाभ मिळवून देण्यासाठी आ. डॉ. अनिल बोंडे  यांनी पुढाकार घेतला असून पुनवर्सन गावातील नागरिकांना भूखंड वाटप व नागरिक सुविधाचे काम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश सुद्धा यावेळी आमदार महोदयांनी  संबंधित  अधिकाऱ्यांना दिले. मोर्शी – वरुड तालुक्यातील दोन्ही पुनवर्सन गावाचा सर्वे २४ ऑक्टोंबर २०१६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची हमी उपस्थित अधिकाऱ्यांनी आमदार महोदयांना दिली असल्याने आता या पुनवर्सन गावासोबतच निम्न चारगड – पंढरी मध्यम प्रकल्पाचा विकास होणे शक्य झाला आहे.
            खोपडा – बोडणा  गावाच्या पुनवर्सनाची  ३ वर्षाअगोदर पडताळणी करण्यात आली होती. परंतु आतापर्यंत शासनाचा कुठलाही लाभ मिळाला नाही. सध्याच्या स्थितीत स्थानिक पुनवर्सन गावातील घरांची अवस्था एकदम खराब झाली असून घरे पडण्याच्या अस्वस्थेत आहे. त्यामुळे अंदाजे दोन्ही गावातील ७५० घरांचे २४ ऑक्टोंबर पर्यंत पुन्हा सर्वेक्षण करून पडताळणी करावी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग द्वारे झालेला सर्वे जिल्हा जलसंपदा विभागाला मान्य राहील असा निर्णय सुद्धा यावेळी घेण्यात आला. २१ जुलै २०१५ रोजी सेक्शन - ४ (नवीन कायदा) लागू झाला असून त्यानुसार मोबदला द्या. त्यासोबतच १९९५ च्या अगोदरचे पुनवर्सन झाले तर त्यांना ताबडतोब मदत द्या. व नियमाकुल करा. तथा प्राथमिक नागरिक सुविधेच्या कामांचा आढावा सुद्धा द्या. कारण सर्व कामे होणे शक्य आहे परंतु अधिकाऱ्यांनी  स्वत:चे नातेवाईक या पुनवर्सन गावात राहतात असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम केले तर काम लवकर पूर्णत्वास जावू शकते असे प्रतिपादन आ.डॉ.अनिल बोंडे यांनी आढावा बैठकीत बोलतांना व्यक्त केले. मोर्शी – वरुड तालुक्यातील पुनवर्सन गावाचा सर्वांगीण विकास व नागरिक सुविधा देण्यास शासन कटिबद्ध असल्याचा निर्वाळा जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी आढावा बैठकीतून दिला.
या बैठकीला मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा पुनवर्सन अधिकारी  नरेंद्र फुलझेले, जलसंधारणचे विभागाचे मुख्य अभियंता निवल,  जलसंपादक विभागाचे क्षीरसागर, मोर्शीचे उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, मोर्शी जलसंपदा विभागाचे बागुल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संतोष जाधव, भूमी अभिलेख विभागाचे अभिलेख जारंडे, मोर्शी  सा. बा. विभागाचे उपविभागीय अधिकारी माळवे.  वरुड  सा. बा. विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रशांत सोळंके, खोपडा ग्राम पंचायाचे सरपंच हरीश लुंगे, सदस्य सचिन वानखडे, अजिंक्य लुंगे, रत्नाकर लुंगे, साहेबराव वानखडे, सी. एल. इंगळे, खोपडाचे गरम पंचायतचे सचिव आमले, बोडणाचे सचिव आमलेताई यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी तसेच खोपडा – बोडणा गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

५ टक्के आरक्षणासाठी 'जमिअत उल' संघटना रस्त्यावर -जिल्हाधिकारी कार्यलयावर आंदोलन

मोठ्या प्रमाणात जनसमुदायाची उपस्थिती 

आजचा आंदोलनातील काही निवडक फोटो आपल्यापर्यंत देत आहोत 








अमरावती /-- ५ टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाज बांधव आज १८ तारखेला रस्त्यावर उतरले . जिल्हाधिकारी कार्यालयावर जमिअत उलमा या संघटनेच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.
मुस्लिम समाजाचा विद्यमान सरकारकडून मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये होणार्‍या वाढत्या हस्तक्षेपाला विरोध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव उपस्थित होते.पोलिसांचा चोख बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता. प्रमुख मंडळींनी यावेळी आपापले विचार यावेळी मंचावर व्यक्त केले 
मुस्लिम आरक्षणाबाबत जमिअत उलेमा ए हिंद ने १९४८ पासून मागणी लावून धरली होती  संघटनेने यासाठी २१ लाख लोकांची स्वाक्षरी मोहीम राबवून राष्ट्रपतींनी निवेदन सादर केले होते. २ ऑक्टोबर २00२ साली या मागणीसाठी देशव्यापी जेलभरो आंदोलन झाले होते. संघटनेचे कार्यकर्ते त्यावेळी १४ दिवस करागृहात बंद होते. मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण मिळावे ही आमची मागणी फार जूनी असून यासाठी अनेकदा आंदोलन, स्वाक्षरी मोहीम आदी मार्गाने शासनाचे लक्ष्य वेधण्यात आले.१९४८ ते २0१६ पर्यंत केलेल्या दीर्घ आंदोलनाचा अहवाल आम्ही शासनाकडे सादर केला आहे. मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण मिळायलाच हवे यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मुस्लीम बांधवांचा विशाल अश्या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.शांततेच्या मार्गाने होणार्‍या या आंदोलनादरम्यान पाण्याची व्यवस्था, वाहन पार्किची काळजी घेतली गेली यावेळी उन्हाचा प्रचंड तडाखा असून देखील मुस्लीम बांधव मोठ्या चिकाटीने भर उन्हात रस्त्यावर बसून होते 

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.