BREAKING NEWS

Wednesday, May 18, 2016

जूनपासून इंग्रजी शाळांचे अनुदान बंद न केल्यास भाजपवाल्यांना क्षमा नाही ! - प्रा. सुभाष वेलिंगकर

 सांगे (गोवा)/-- -





जे मातृभाषा पायदळी तुडवतात, सत्तेसाठी आईस्वरूप असलेल्या मातृभाषेच्या चारित्र्याचा सौदा करतात, अशा आमदारांमध्ये प्रजेसमोर ताठ मानेने फिरण्याची धमक आहे का ? ज्या ठिकाणी सत्य आहे, तेथे धर्म आहे. जेथे धर्म आहे, तेथेच ईश्‍वर आहे. येत्या जूनपासून इंग्रजी शाळांचे अनुदान बंद करा, नाहीतर परतीचा रस्ता धरा. भाजपवाल्यांना यापुढे क्षमा नाही. सत्ताधारी आमदारांना पोलिसांचा आधार घेतल्याशिवाय फिरणेच कठीण होणार आहे, अशी खणखणीत चेतावणी भारतीय भाषा सुरक्षा मंचचे (भाभासुमंचे)समन्वयक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या सांगे येथील सभेत दिली. सभेला २ सहस्रांहून अधिक मातृभाषाप्रेमी उपस्थित होते.या वेळी शिक्षणतज्ञ श्री. पांडुरंग नाडकर्णी, भाभासुमंच्या महिला प्रमुख अधिवक्त्या स्वाती केरकर, स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली, लेखक पुंडलिक नायक, माजी सनदी अधिकारी अरविंद भाटीकर, अधिवक्ता उदय भेंब्रे, सुभाष देसाई, तसेच भाजपचे माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, अनेक पंचायतींचे सरपंच, नगरसेवक, जिल्हा पंचायत सदस्य आणि पंचसदस्य उपस्थित होते.
     या वेळी बोलतांना अधिवक्त्या स्वाती केरकर म्हणाल्या, जसे लहान बाळाला आईचे दूध आवश्यक असते, तसेच मातृभाषेतील प्राथमिक शिक्षणामुळे बाळाचा सर्वांगीण विकास होतो.
      नागेश करमली म्हणाले, भाभासुमं धार्मिक तेढ निर्माण करून गोव्याचे तुकडे करत आहे, अशी टीका काही विरोधक करत आहेत. भाभासुमं गोवा एकसंघ रहावा, यासाठी गेली ६० वर्षे रक्त आटवणार्‍या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आहे. भाषावादातून राज्याचे तुकडे व्हावे, हा आमचा उद्देश नाही.
     पुंडलिक नायक म्हणाले, भाजपच्या आमदारांची निष्ठा मायभूमीकडे, मातृभाषेकडे आहे का ? असेल, तर या आमदारांनी मातृभाषेच्या बाजूने समर्थपणे उभे रहावे.
     अरविंद भाटीकर म्हणाले, भारतातल्या २६ राज्यांत मातृभाषेतूनच शिक्षण दिले जाते. नागालॅण्ड आणि मिझोरम सोडल्यास भारतातल्या कोणत्याही राज्यात परकीय भाषेतील शिक्षणाला अनुदान नाही; मात्र गोव्यातच अल्पसंख्यांकांना चुचकारण्यासाठी इंग्रजीचे स्तोम माजवण्याचा जो प्रकार चालू आहे. त्याला आमचा तीव्र विरोध आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.