BREAKING NEWS

Monday, February 13, 2017

शहरात प्रभु विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी - गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

चांदुर रेल्वे - शहेजाद खान --



स्थानिक शेतकरी भवन येथे प्रभु विश्वकर्मा जंयती नुकतीच उत्साहात साजरीे करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुतार समाज विकास संस्थाचे अध्यक्ष राजेंद्र वेलनकर हे होते तर उद्घाटक म्हणुन आ. विरेंद्र जगताप होते. तसेच प्रमुख अतिथि म्हणुन श्री निलेश विश्वकर्मा, दिलीप आकोटकर, दिवाकर खेडकर , शामराव शिगनापुरे व प्रमोद कोळमकर यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, प्रसन्ना पाटील व भुषण नाचवणकर यांच्यातर्फे सुतारी कामाला चालना देण्याकरीता कटर व ड्रील मशिन वाटप करण्यात आले तसेच शालेय साहित्यही वाटण्यात आली.




कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुधाकर नाचवणकर, सूत्रसंचलन संतोष खानजोडे तर आभार प्रदर्शन  सचिन मेहरकर यानी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता  सुनिल कवडकर, मनोज कडुकर, निलेश चादुरकर, गजानन देऊळकर, राजेंद्र कडुकर, भरत नाचवणकर, प्रशांत मेहरकर , सुनील आकोटकर ,देवेंद्र पाडे , संजय काळे , राजेश पाडे , खुशाल मेहरकर, विनोद खानजोडे, शैलेष इंगळकर, गजानन विलायतकर, निलेश सुर्यवंशी आदींनी अथक परीश्रम घेतले. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

1 comment :

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.