कोल्हापूर –
आज पुरोगामी, डाव्या विचारसरणीचे लोक हिंदु धर्म-संस्कृती यांना बुडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काही लोक परकीय साहाय्य घेऊन हिंदु धर्मावर आघात करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. अशा वेळी हे आक्रमण परतवून लावण्यासाठी आपल्याला सामूदायिक कृती करावी लागेल. हिंदुत्वाचे जे कार्य करतात अशी गणेशोत्सव मंडळे, तरुणांची मंडळे, सामाजिक मंडळे यांतील तरुणांमध्ये हिंदुत्वाचे बीज रोवण्यासाठी प्रयत्न करा, असे मार्गदर्शन सातारा येथील ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज यांनी केले. ते गोकुळ-शिरगाव येथील श्री भगवती मंगल कार्यालयात झालेल्या एक दिवसीय प्रांतीय अधिवेशनात बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे पश्चिपम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये उपस्थित होते. या अधिवेशनासाठी बेळगाव, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतून ९० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. या वेळी सातारा येथील पू. विठ्ठल स्वामी यांचीही वंदनीय उपस्थित होती, त्यांचा सन्मान डॉ. मानसिंग शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रारंभी सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज यांचा सत्कार सनातनचे साधक आधुनिक वैद्य (डॉ.) मानसिंग शिंदे यांनी केला, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा सन्मान सौ. अरुणा पेडणेकर यांनी केला, तर श्री. मनोज खाडये यांचा सत्कार कोल्हापूर येथील हिंदु धर्माभिमानी श्री. गोविंद देशपांडे यांनी केला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी अधिवेशनाचा उद्देश स्पष्ट केला. अधिवेशनासाठी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी पाठवलेल्या संदेशाचे वाचन सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी केले.
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण
६ फेब्रुवारीला पोलीस डॉ. तावडे यांना न्यायालयात उपस्थित करणार का, याविषयी प्रश्नचिन्ह !
कोल्हापूर – सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना कोल्हापूर येथील न्यायालयात उपस्थित करण्यात येत नाही. यासाठी पोलीस वेगवेगळी कारणे देत आहेत. डॉ. तावडे यांना कोल्हापूर येथे उपस्थित न करण्याला ४ मासांहून अधिक काळ लोटला आहे. कॉ. पानसरे हत्या प्रकरणाच्या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी डॉ. तावडे यांना उपस्थित न केल्याने अधिवक्ता म्हणून माझीही त्यांच्याशी भेट होऊ शकलेली नाही. ही एकप्रकारे पोलिसांनी डॉ. तावडे यांच्या न्यायअधिकारावर आणलेली गदाच आहे, याची गंभीर नोंद न्यायालयाने घ्यावी, असे मत डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचे अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.
सोमवार, ६ फेब्रुवारी या दिवशी या प्रकरणाची सुनावणी आहे. गेल्या ४ मासांपासून पोलिसांची एकूणच वेळकाढूपणाची भूमिका पहाता सोमवारी पोलीस डॉ. तावडे यांना न्यायालयात उपस्थित करणार का, यावर प्रश्नचिन्हच निर्माण झाले आहे. मागील सुनावणी २१ जानेवारी या दिवशी झाली. त्या वेळी न्यायालयाचे आदेश असतांनाही डॉ. तावडे यांना उपस्थित करण्यात आले नव्हते. त्या सुनावणीत अन्वेषण अधिकारीही न्यायालयात उपस्थित नव्हते आणि सरकारी अधिवक्ता कोणतेही समाधानकारक उत्तर न्यायालयास देऊ शकले नाहीत.
खटला लांबवण्याचा पोलिसांचा डाव !
या प्रकरणात संशयित म्हणून अटक करण्यात आलेले सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांनाही पोलिसांनी न्यायालयात उपस्थित करण्यास नेहमीच विलंब केला. ९ ऑक्टोबर २०१५ या दिवशी श्री. समीर यांचे ब्रेनमॅपिंगचे आवेदन फेटाळल्यानंतर खटला लांबवण्याच्या कुटील उद्देशाने श्री. समीर यांना दोन मास न्यायालयातच उपस्थित करण्यात आले नाही. गणेशोत्सव आहे, निवडणुका आहेत, हाय प्रोफाईल कैदी, अपुरे मनुष्यबळ, अशी वेगवेगळी कारणे देत पोलीस श्री. समीर यांना न्यायालयात उपस्थित करणे टाळत होते. अखेर एक मासाच्या प्रदीर्घ युक्तीवादानंतर २१ नोव्हेंबर या दिवशी श्री. समीर यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळाली. यानंतर डिसेंबर २०१५ पासून श्री. समीर यांना परत न्यायालयात उपस्थित करण्यात येऊ लागले. यानंतर मार्च-एप्रिल २०१६ मध्येही अशाच प्रकारे विविध कारणे देत पोलीस श्री. समीर यांना न्यायालयात उपस्थित करण्याचे टाळत होते. असाच प्रकार पोलीस आता डॉ. तावडे यांच्याविषयी करत आहेत. पोलिसांचे हे वेळकाढू धोरण पोलिसांच्या कार्यपद्धतीवर निश्चित संशय घेण्यास जागा ठेवते.
विशेष आभार /- दैनिक सनातन प्रभात वृत्तसंकेतस्थळ
कोल्हापूर
– येत्या ६ मार्चला मुंबई येथे अर्थसंकल्पीय उन्हाळी अधिवेशनास प्रारंभ होणार आहे. त्या अनुषंगाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी शिवसेना आणि भाजप आमदारांच्या भेटी घेऊन त्यांना विविध विषयांची निवेदने देण्यात येत आहेत. त्या पार्श्व्भूमीवर २९ जानेवारीला दुपारी १.३० वाजता येथील शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांची हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांनी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनीश्री. राजेश क्षीरसागर यांना श्री महालक्ष्मी देवस्थानातील पवित्र मनकर्णिका कुंडावर पुरातत्व खात्याची अनुमती न घेता बांधलेले अनधिकृत शौचालय पूर्णपणे निष्कासित करून ते कुंड पूर्ववत् भाविकांसाठी खुले करण्यात यावे, या मागणीचे निवेदन दिले. या वेळी हा विषय विधानसभेत मांडण्याचे आश्वाकसन श्री. क्षीरसागर यांनी दिले. निवेदन देतांना सर्वश्री मधुकर नाझरे, किरण दुसे, शिवानंद स्वामी, शिवसेनेचे किशोर घाडगे आदी उपस्थित होते.
समता संघर्ष समितीचा थयथयाट
कोल्हापूर – २० जानेवारीला रात्री एका वृत्तवाहिनीवर झालेल्या मुलाखतीच्या वेळी सनातनचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी कॉ. गोविंद पानसरे यांच्याविषयी काही विधाने केली होती. कॉ. गोविंदराव पानसरे यांच्याविषयी वक्तव्ये केल्याप्रकरणी सनातन संस्थेचेे प्रवक्ता आणि अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांचा ‘शहीद कॉ. गोविंद पानसरे समता संघर्ष समिती’च्या वतीने निषेध करण्यात आला. (सनातनद्वेषापोटी पुरोगामी मंडळींकडून अशी आंदोलने करण्यात येत आहेत. अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी केलेले आरोप जर खोटे असतील, तर अशी आंदोलने करण्याऐवजी पुरोगाम्यांनी ते पुराव्यासह सिद्ध करून दाखवावेत ! – संपादक) संघर्ष समितीच्या वतीने २१ जानेवारी या दिवशी सायंकाळी येथील बिंदू चौकात हा निषेध करण्यात आला.
या वेळी दिलीप पवार म्हणाले, ‘‘शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, आणि एम्.एम्. कलबुर्गी यांच्या मारेकर्यांना त्वरित अटक करावी. सनातनचे साधक सारंग अकोलकर, विनय पवार यांच्या विरोधात पोलिसांकडे ठोस पुरावे असल्याने त्यांचा शोध लवकर घेणे आवश्यक आहे. (पोलिसांकडे पुरावे असल्याचा पवार यांचा जावईशोध ! – संपादक) लोकशाही आणि संविधान व्यवस्था न मानणार्या सनातन संस्थेची सखोल चौकशी व्हावी. (लोकशाही आणि संविधान व्यवस्था न मानल्याचे एकतरी उदाहरण पवार दाखवतील का ? सध्याच्या लोकशाही व्यवस्थेत काय उणिवा आहेत, हे उदाहरणासह सनातन प्रभातमधून प्रसिद्ध केले जाते. एखाद्या गोष्टीतील न्यूनत्व दाखवण्याचा अधिकार सनातनला नाही आणि जातीद्वेषी अन् इतिहासद्रोही गरळओक करण्याचा अधिकार मात्र पुरोगाम्यांना आहे का ? स्वतःसाठी अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि इतरांनी काही सांगितले, तर त्यांच्या चौकशीची मागणी, ही असहिष्णुता नव्हे का ? – संपादक)
(म्हणे) ‘अधिवक्ता पुनाळेकर आणि प्रवक्ता अभय वर्तक यांच्याकडून डॉ. दाभोलकर अन् कॉ. पानसरे यांचे चारित्र्यहनन !’
मेधा पानसरे यांचा तीळपापड
मेधा पानसरे म्हणाल्या, ‘‘गेल्या कित्येक वर्षांपासून सनातन संस्थेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर, प्रवक्ता अभय वर्तक आणि सनातन संस्था ही कॉ. गोविंद पानसरे अन् डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे चारित्र्यहनन करत आहेत. पुनाळेकर यांनी कॉ. पानसरे, डॉ. दाभोलकर यांच्या विरोधात केलेले वक्तव्य चुकीचे आहे, तसेच सनातन पत्रिकेला पाठिंबा आणि बॉम्बस्फोटात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे काम पुनाळेकर करत आहेत. त्यामुळे पुरोगामी संघटना त्यांचा निषेध करत आहे. (डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणात सनातनचा काडीमात्र संबंध नसतांना पोलीस यंत्रणा सनातनच्या साधकांना विनाकारण त्रास देऊन त्यांचा शारिरीक आणि मानसिक छळ करत आहेत. अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर आणि प्रवक्ता श्री. अभय वर्तक हे सनातनच्या साधकांची सत्य बाजू वृत्तवाहिन्या अन् विविध वर्तमानपत्रांतून मांडत आहेत. असे असतांना याचा काहीही अभ्यास न करता अशी बेताल वक्तव्य करून पुरोगामी मंडळी स्वतःचे हसेच करून घेत आहेत ? – संपादक)
साभार - दैनिक सनातन प्रभात / वृत्त्संकेत्स्थळ
देशी गायींना राष्ट्रमाता म्हणून सन्मान मिळावा !
कोल्हापूर– गो-कथाकार श्री. गोपालमणी महाराज यांच्या ‘भारतीय गौ क्रांती मंच आंदोलना’द्वारे देशी गायींना राष्ट्रमाता म्हणून सन्मान मिळावा, यासाठी ९ मे २०१६ पासून गौ प्रतिष्ठा भारत यात्रा उत्तराखंड गंगोत्री येथून चालू आहे. ही यात्रा २४ जानेवारी या दिवशी कोल्हापूर येथे येणार आहे. त्या निमित्ताने शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ५ वाजता ‘गो-कथे’चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती बजरंग दलाचे शहरप्रमुख श्री. महेश उरसाल यांनी २१ जानेवारी या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख सर्वश्री संभाजी साळुंखे, विहिंपचे अधिवक्ता सुधीर जोशी, डॉ. केदार तोडकर, ओंकार कारदगेकर, राजेंद्र सूर्यवंशी, सुनील पाटील, हिंदु जनजागृती समितीचे मधुकर नाझरे, सुधाकर सुतार, अनिरुद्ध कोल्हापुरे आदी उपस्थित होते.
श्री. महेश उरसाल म्हणाले, ‘‘श्री. गोपालमणी महाराज हे गो-कथा सांगणारे सुप्रसिद्ध कथाकार आहेत. त्यांनी यापूर्वीही ‘भारतीय गौ क्रांती मंच’च्या माध्यमातून आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी संपूर्ण देशभर देशी गायीचे महत्त्व पटवून सांगण्यासाठी ‘गौ प्रतिष्ठा भारत यात्रे’ला प्रारंभ केला आहे. ही यात्रा देशातील ६७६ जिल्ह्यांमध्ये जाणार आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांतून प्रवास करत ही यात्रा ८ जानेवारी या दिवशी महाराष्ट्रात आली आहे. २४ जानेवारी या दिवशी होणार्या कार्यक्रमात गोपालक आणि गोरक्षक यांचा श्री. गोपालमणी महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.’’
विहिंप, बजरंग दल, सेवा व्रत प्रतिष्ठान, होय हिंदूच संघटना, हिंदु एकता आंदोलन, पतित पावन संघटना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती, वन्दे मातरम् युथ ऑरगनायझेशन आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना, कोल्हापूर इत्यादी हिंदुत्ववादी संघटना या कार्यक्रमाचे आयोजक आहेत.
कोल्हापूर–
श्रीक्षेत्र काशीचा अवमान करणार्या मोहल्ला अस्सी आणि पाक कलाकार यांची भूमिका असलेला रईस हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तरी हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित करू नये, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील अयोध्या चित्रपटगृहाचे व्यवस्थापक सर्वश्री विजय पोवार आणि पार्वती मल्टिप्लेक्सचे व्यवस्थापक अमर कारंडे यांना १३ जानेवारीला निवेदन देण्यात आले. सर्वश्री विजय पोवार आणि अमर कारंडे यांनी चित्रपटगृहाच्या मालकांना याची माहिती देऊन चित्रपट रहित करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे सर्वश्री शिवाजीराव ससे, हिंदु जनजागृती समितीचे गोविंद देशपांडे, देवराज सहानी, मधुकर नाझरे, शिवानंद स्वामी, बाबासाहेब भोपळे, रणरागिणी शाखेच्या सौ. साधना गोडसे, सौ. सरस्वती मिराशी, सौ. विजया वेसणेकर, सनातन संस्थेच्या सौ. नंदिनी कुलकर्णी, सौ. सुधा बिलावर आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
 |
आंदोलनात बोलतांना सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे
|
कोल्हापूर- हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे १९ डिसेंबर या दिवशी ऐन तळपत्या उन्हात दुपारी १२ वाजता घेण्यात आलेल्या आंदोलनात ८० हून अधिक रणरागिणींनी थाळीनाद करत पुणे येथे होणारे सन बर्न रहित करा, अशी जोरदार मागणी केली.
 |
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करतांना शिवसैनिक
|
कोल्हापूर - १४ डिसेंबर या दिवशी कोल्हापुरात काढण्यात आलेल्या मोर्च्यात सहभागी असलेली एक व्यक्ती पाकिस्तानी ध्वज घेऊन फिरत होती. यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था यांचा भंग होऊ शकतो, तरी अशा समाजकंटकावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनाप्रमुख श्री. संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली.
या वेळी सर्वश्री सुजीत चव्हाण, बाजीराव पाटील, विराज पाटील, करवीर तालुका प्रमुख श्री. राजू यादव, विनोद खोत, सुधीर राणे, राजू सांगावकर, सौ. शुभांगी पोवार, सुजाता सोहनी, सौ. रिया पाटील, सौ. दीपा शिंदे यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदरच्या निवेदनावर जिल्हाप्रमुख श्री. विजय देवणे, शहरप्रमुख श्री. शिवाजीराव जाधव आणि श्री. दुर्गेश लिंग्रस यांच्या स्वाक्षर्या आहेत. श्री. संजय पवार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सतत भारत विरोधी कृती करून देशातील शांतता भंग करण्याचा रडीचा पाकिस्तान नेहमी खेळत असतो. अशा प्रकारे पाकिस्तानी ध्वज घेऊन कोल्हापुरातील सलोख्याचे वातावरण जाणीवपूर्वक बिघडवणार्या या समाजकंटकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी.