BREAKING NEWS

Thursday, April 21, 2016

उच्चभ्रू घराण्यातील मुलानं केला जन्मदात्या आईचा गळा चिरुन व दोन्ही हाताच्या नसा कापुन भरदिवसा खुन - चंद्रपूर शहरातल्या तुकूम भागातील घटना - आरोपी अद्याप फरार, मुलावर खुनाचा गुन्हा दाखल

●प्रवीण गोंगले / चंद्रपूर ● 



 



उच्चभ्रू कुटूंबातील एकुलत्या एका मुलानं जन्मदात्या आईचा गळा चिरुन व दोन्ही हाताच्या नसा कापुन खुन केल्याची घटना २० एप्रिलच्या दुपारी चंद्रपूर शहरातल्या तुकूमातील उपगन्लावार ले आउट मध्ये उजेडात आली. आरोपीनं खुन केल्यानंतर याबाबतची माहिती बहिणीला एस एम एस द्वारे दिल्यानं ही घटना उजेडात दिली. खुनाची घटना सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास घडली असुन अंगावरील शहारे उभे करणाऱ्या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे. अंजली हेमंत कुलकर्णी असं ५९ वर्षीय महिलेचं नाव असुन आरोपी मुलाचं नाव कौस्तुभ कुलकर्णी असं आहे. रामनगर पोलीसांनी याप्रकरणी खुनाचा नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे. आरोपी अद्याप फरार असुन पोलिस त्याच्या मागावर आहे. चंद्रपूर शहरातील तुकूम तलाव वार्डातील उपगन्लावार ले आउट परिसरात कुलकर्णी कुटूंबिय वास्तव्यास आहे. सेवानिवृत्त सैनिक असलेल्या हेमंत व मृत अंजली याना कौस्तुभ नावाचा एक मुलगा व मुलगी आहे. कुलकर्णी यांच्या दोन्ही मुलांचां नुकतंच विवाह झाला असुन कौस्तुभचं ताडोबा मार्गावर मोबाईल शॉप आहे. दरम्यान, २० एप्रिलच्या दुपारी अत्यंत गुण्यागोविंदानं जिवन जगणाऱ्या कुलकर्णी कुटूंबातील अंजली या ५९ वर्षीय महिलेचा घरात कुणीही नसताना मुलानंच गळा चिरुन व दोन्ही हाताच्या नसा कापुन खुन झाल्याची उघडकिस आली. आरोपी मुलानं खुन केल्यानंतर याबाबतची माहिती बहिणीला एस एम एस द्वारे दिली आणि त्यानंतर घराला कुलुप ठोकुन पळ काढला. दरम्यान, प्राप्त माहितीनुसार घर गाठुन पाहणी केली असता, खुनाची घटना उजेडात आली. यानंतर पाहता पाहता घटनास्थळी बघ्यांसह उप विभागीय पोलिस अधिकारी व रामनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संपत चव्हाण घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन मृतदेहाला पोस्टमार्टमकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. सध्या आरोपी फरार असुन पोलिसांनी एस एस एम वरुन मुलावर खुनाचा करुन त्याचा शोध सुरु केला आहे. हृदयाचा थरकाव उडविणाऱ्या या घटनेनं परिसर नव्हे शहर नव्हे तर संपुर्ण जिल्हा हादरला असुन या घटनेचा पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहे. मोबाईल शॉप असलेल्या आरोपी मुलाचं नुकतंच प्रेमविवाह झाला असुन त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याची व याच कारणामुळं गेल्या २ दिवसापासुन मायलेकात भांडण होत असल्याची माहिती आहे. असं असलं तरी आरोपीच्या अटकेनंतर या घटनेचा उलगडा होणार असल्यानं पोलिसांच्या तपासाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. by प्रविण गोंगले, चंद्रपूर

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.