BREAKING NEWS

Friday, April 8, 2016

दारव्हा येथील न्यायधीश आत्महत्या प्रकरणी यवतमाळच्या पाच न्यायधीशांवर गुन्हे दाखल चांदूरच्या रेल्वे क्रॉसिंगवर केली होती आत्महत्या

🔹चांदूर रेल्वे / शहेजाद खान /🔹--- एक महिण्यापूर्वी चांदूर रेल्वे-अमरावती बायपास रेल्वे क्रॉसिंगवर दारव्हा येथील न्यायाधिशाने आत्महत्या केली होती. त्या प्रकरणी गुरूवारी रात्री यवतमाळच्या त्या पाच न्यायधीशांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा भादंवि कलम ३०६ अन्वये दाखल करण्यात आला. मृत न्यायधीशाच्या सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये यवतमाळचे जिल्हा न्यायाधिश श्री दि.रा.शिरसाव, विधी सेवा प्राधिकरण सदस्य श्री एस.एम.आगरकर, दिवानी न्यायाधिश वरीष्ठ स्तर श्री डि.एम.खडसे,तसेच मुख्य न्यायदंडाधिकारी श्री आर.पी.देशपांडे, दुसरे दिवानी न्यायाधिश वरीष्ठ स्तर श्री एच.एल.मनवर या पाच न्यायधीशांनी त्रास दिल्याचा उल्लेख होता. ६ मार्च च्या सकाळी दारव्हा येथील दिवानी न्यायधीश वरीष्ठ स्तर पदावर कार्यरत असलेले अनुप दिवाकरपंत जवळकार यांनी चांदूर क्रॉसींगवर रेल्वे खाली झोकून आत्महत्या केली होती. ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली होती. एका उच्चपदस्थ न्यायधीशाला का आत्महत्या करावी लागली याबद्दल जनमानसात चर्चा सुरू होती. अशातच १ एप्रिल रोजी मृतक न्यायाधिश जवळकार यांचे घरगुती सामान पुणे येथे हलवित असतांना त्यांचे लहान बंधूना सामानात एक पाकीट मिळून आले.त्यात अनुप जवळकारच्या स्वहस्ताक्षरातील चिठ्ठी मिळाली. त्या चिठ्ठीत '' माझ्या मृत्यूला यवतमाळचे जिल्हा न्यायाधिश दि.रा.शिरसाव, विधी सेवा प्राधिकरण सदस्य एस.एम.आगरकर, दिवानी न्यायाधिश वरीष्ठ स्तर डि.एम.खडसे, मुख्य न्यायदंडाधिकारी आर.पी.देशपांडे, दुसरे दिवानी न्यायाधिश वरीष्ठ स्तर एच.एल.मनवर हे जबाबदार आहे व त्यांच्या छळामूळे मी आत्महत्या करीत आहे.'' असा उल्लेख होता. त्यांचे लहान बंधू अमोल दिनकरराव जवळकार यांनी त्या पाच न्यायधीशविरूध्द गुन्हे दाखल करा अशी तक्रार चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनसह अमरावती पोलीस अधिक्षक, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे केली होती. जिल्हा पोलीस अधिक्षक लखमी गौतम यांनी मिळालेल्या सुसाईड चिठ्ठीची शहनिशा व तपासनीनंतर त्या संशयीत न्यायधीशांवर गुन्हे दाखल केले. 



http://vidarbha24news.com/ShowNews.aspx?id=2269
Vidarbha News , Amravati News , Maharashtra News

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.