BREAKING NEWS

Saturday, April 9, 2016

कोर्टातून अमित शाह निर्दोष सूटतात , मग राम मंदिर वर तोडगा का नाही ? -- श्री राज ठाकरे

विशेष बातमी /--- http://vidarbha24news.com/ShowNews.aspx?id=2270


खूप दिवसानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज साहेब ठाकरे याची आज जाहीर सभा झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांनी भाषण सुरु राज साहेबानी यावेळी सर्वाना मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या सभेचा सुरवातीलाच परवानगी संदर्भात त्यांनी ताशेरे ओढले .वाहतुकीचा आवाज १०० डेसिबल पेक्षा जास्त. सभा कशी ५० डेसिबल मधे मावणार असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली मला शिवसेनेच्या बुद्धीची कीव येते. महापालिकेत सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे आणि मनसेचा कार्यक्रमावर झेंडे लावले.. याची कीव येते शिवसेनेने लावलेले झेंडे म्हणजे बाळासाहेबांचा आशीर्वाद असे ते म्हणाले सदर सभेत त्यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे मीडिया यावर सुद्धा टीका केली एकतर सत्तापक्ष किंवा विरोधी पक्ष हीच त्यांची बाजू राहिलेली आहे. असे ते म्हणाले यावेळी विद्यमान सरकार ज्या राम मंदिर मुद्यावर निवडून आले ते राम मंदिर चा मुद्दा अजून का मार्गी लागत आहे असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला कोर्टातून अमित शाह निर्दोष सुटतात मग राम मंदिर वर तोडगा का नाही असेही ते म्हणाले कुठे आहे राम मंदिर राज ठाकरेंचा भाजप ला सवाल.. (याला आंदोलन अर्धवट सोडल म्हणतात) त्यांनी केला आहे www.vidarbha24news.com जैतापूर प्रकल्पच काय झाल? शिवसेनेला सवाल. शिवसेना अपमान सहन करून सुद्धा सत्ता सोडत नाही आहे अमित सहा सुटतात. राम मंदिर का नाही? भारताचे प्रधानमंत्री पाकिस्तान च्या प्रधानमंत्रीना केक भरवतात आणि लेगच पठाणकोट हल्ला झाला. मला रतन टाटांनी गुजरात बद्दल सांगितल.. मी म्हटलं चला पाहूया.. मग पाहून झाल्यावर निघताना मी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात सांगितल कि प्रगतीच्या बाबतीत महाराष्ट्र क्रमांक १ वर आहे. पण ज्याप्रकारे गुजरात प्रगती करत आहे त्याप्रमाणे गुजरात लवकर प्रगती करेल असेल बोललो. पण पंतप्रधान झाल्यावर मोदी बदलले. जे निर्णय कॉंग्रेस ने घेतले तेच भाजप ने घेतले. १०० दिवसात अच्छे दिन येणार होते.. कुटेह गेले अच्छे दिन? विरोधात असतांना मोदिनी भाषण केल होत कि सोन्यावर कर आकारू नका.. याने गरीब माणूस सोन घेऊ शकणार नाही. आता सत्तेत आल्यावर मोदिनी पलटी मारली. एक भूल कमल का फुल स्वच्छता मोहीम ही महाराष्ट्रातील संत गडगे बाबांनी आणली मग त्यांचं नाव राष्ट्रीय स्तरावर का नाही असे ते म्हणाले कोण देशद्रोही आणि कोण देशभक्त हे भाजप ने ठरवू नये आणि तसे प्रमाणपत्र वाटू नये ओवैसी महाराष्ट्रात ये.. तुझ्या गळ्यावर सुर फिरवतो असे ते म्हणाले ओवैसी ला भाजप मोठ करत आहे मी हिंदू आहे, माझ धर्मांतर झालेलं नाही..माझ्या पक्षाच्या झेंड्यात नीळा दलित बंधावानांचा आहे, भगवा हिंदुत्वासाठी आहे, आणि हिरवा अब्दुल कलम , ए. आर रेहमान साठी आहे. भाजप सरकार ला भारत माता कि जय, वंदे मातरम पुढे काही सुचतच नाही आहेनरेंद्र मोदी परदेशातून पैसे आणणार होते आणि लोकांमध्ये वाटणार होते. काय झाल त्याच , विजय मल्या पैसे घेऊन गेला विदर्भ स्वतंत्र करा, मराठ्वाडा स्वतंत्र करा काय बापाचा माल वाटला? असा टोला त्यांनी वेगळी राज्य मागणाऱ्यांवर केला आहे मा. गो वैद्य बोलतात महाराष्ट्राचे ४ तुकडे करा. काय वाढदिवसाचा केक वाटला का? कुठेही वाटायला असा टोल त्यांनी वेगळ्या राज्यांचा भूमिकेवर लगावला केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्यमंत्री विदर्भातून देऊन सुद्धा विदर्भाचा विकास झाला नाही तर मग दोष महाराष्ट्राचा कसा? या देशावरती राज्य मराठयांच होत. हे सगळ विसरलो आपण? आणि कसेही तुकडे पडायचे या राज्यांचे विदर्भ, मराठवाडा चा विकास जमत नसेल तर फडणवीस राजीनामा द्या संघाला इतकंच असेल तर आधी गुजरातचे तुकडे करून दाखवा मराठवाड्यात पाण्याची परिस्तिथी तिथल्याच नेत्यांमुळे निर्माण झाली आहे तशीच विदर्भातली विदर्भातल्या नेत्यांमुळे कॉंग्रेसच्या राज्यात शेतकरी आत्महत्या करत होता आता भाजपच्या राज्यात पण शेतकरी मारतोच आहे. परिस्तिथी तशीच आहे मंत्रालयाबाहेर शेतकरी विष घेऊन आत्महत्या करतो. त्याची चर्चा होत नाही. देवेंद्र फडणवीस तुमच्यात आणि कॉंग्रेस मधे काय फरक? राज ठाकरे यांनी यावेळी ओवेसी यावर हि सडकून टीका केली ओवेसी काहीही बोलले तरी केसेस लागत नाहीत त्या फक्त राज ठाकरे काही बोललें कि लागतात शहरांमध्ये पाण्याची परिस्तिथी निर्माण झाली आहे. लोंढ्यामुळे ही पाणी टंचाई उत्तर प्रदेश आणि बिहार मधून येणाऱ्या लोंढ्याना पाणी मिळाव म्हणून मराठी माणसाला पाही कमी वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालाय असेही ते यावेळी म्हणाले सदर सभेला प्रचंड प्रमाणात गर्दी होती खार तर आजची सभा पाहून विरोधकांचा छातीत नक्कीच धडधडायला लागले असेल हे मात्र नक्कीच . Maharashtra navnirman sena MNS News

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.