BREAKING NEWS

Saturday, April 9, 2016

श्रीरामनवमीला श्रीरामजन्मभूमीवर पूजेसाठी हिंदूंना विशेष अनुमती द्या ! - समस्त हिंदूंची मागणी - पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांद्वारे ४८ हजार २४० स्वाक्षर्‍यांचे निवेदन सादर

मुंबई -  http://vidarbha24news.com/ShowNews.aspx?id=2273   


भगवान श्रीराम हे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. उत्तरप्रदेशातील अयोध्या हे प्रभु श्रीरामाचे जन्मस्थान असल्याचे सर्वदृष्ट्या सिद्ध झालेले आहे. ३० सप्टेंबर २०१० या दिवशी अहलाबाद उच्च न्यायालयानेही ऐतिहासिक निवाडा देतांना सुन्नी वक्फ बोर्डाचा दावा धुडकावून लावत सदर स्थळ रामजन्मभूमी आहे, त्या जागी श्रीरामलल्ला विराजमान आहेत. श्रीराम मंदिर तोडून विवादास्पद वास्तू उभारण्यात आली आहे, असे स्पष्टपणे सांगितले. असे असतांना दुर्दैवाने श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणी श्रीरामाची पूजा करण्याचा अधिकार नाकारला जात आहे. तरी केंद्रशासनाने विशेषाधिकार वापरून १५ एप्रिल २०१६ या श्रीरामनवमीच्या दिवशी श्रीरामजन्मस्थळी पूजा करण्याची अनुमती हिंदूंना द्यावी, अशी मागणी ४८ सहस्र २४० सह्यांच्या माध्यमांतून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे. हे निवेदन सहस्रावधी स्वाक्षरांची सूचीसह पंतप्रधान मोदी यांना पाठवण्यासाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना देण्यात आले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे, समितीचे कार्यकर्ते श्री. सतिश सोनार आणि श्री. अजय संभूस यांनी मुख्यमंत्र्यांची मंत्रालयात भेट घेतली. श्रीरामाची पूजा करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी शेकडो कार्यकर्ते राज्यभरातून स्वाक्षरी चळवळ राबवत आहेत. या स्वाक्षरी चळवळीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून सह्यांची संख्या वाढतच आहे. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करण्यात येणार्‍या निवेदनात म्हटले आहे की, हिंदूंनी बहुसंख्येने जनादेश देऊन भाजपला सत्ताप्राप्ती करून दिली आहे. भाजपनेही घोषणापत्रात श्रीराम मंदिर उभारण्याचे आश्‍वासन दिले आहे. तरी भाजपने आपली वचनपूर्ती करावी. आजही प्रभु श्रीरामचंद्र यांना अयोध्यानगरीत एका तंबूत ठेवण्यात आलेले आहे. हे अत्यंत अपमानजनक असून पुढील निवाडा येईपर्यंत तेथे तात्पुरते लहान मंदिर बांधून प्रभु श्रीरामाला सुयोग्य पद्धतीने आणि सन्मानपूर्वक विराजमान करावे. Ram Mandir News, Sanatan Sanstha News , Hindu Janjagruti Samiti News

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.